26 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeराजकीयनाशिकवरील ड्रग - वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

 नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना तिकीट दिले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून रामभाऊ वाजे यांना तिकीट दिले गेले आहे. तिसरे उमेदवार शांतीगिरी महाराज रिंगणात उतरले आहेत

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना तिकीट दिले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून रामभाऊ वाजे यांना तिकीट दिले गेले आहे. तिसरे उमेदवार शांतीगिरी महाराज रिंगणात उतरले आहेत (Shiv Sena’s Eknath Shinde group has fielded sitting MP Hemant Godse, Uddhav Balasaheb Thackeray’s Rambhau Waje, the third candidate Shantigiri Maharaj from the group). शांतीगिरी महाराज यांचा मोठा अनुयायी वर्ग या मतदारसंघात आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगली रंगत येणार आहे. राजकारणात चांगली माणसं येत नाहीत. चांगल्या माणसांनी राजकारणात यायला हवे. तरच राजकारणात बदल घडतील, असे शांतीगिरी महाराज यांनी म्हटले आहे. शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात नाशिकचा विकास झाला पाहिजे. गेल्या १० वर्षात नाशिकला चांगलं नेतृत्व लाभलेलं नाही. त्यामुळे आपण या मतदारसंघाचं नेतृत्व करून एक आदर्श मतदारसंघ म्हणून नाशिकला देशात नावारूपाला आणू, असा आशावाद शांतीगिरी महाराज यांनी व्यक्त केला आहे.

नाशिकमध्ये अनेक प्रश्न आहेत. तरूण पिढी ड्रग्जच्या आहारी जात आहे. नाशिकचे नाव देशभरात डॅग्ज व वाईन कॅपिटल म्हणून नावारूपाला येत आहे. हे फारच वाईट आहे. खरेतर नाशिकमध्ये अनेकविध देवस्थानं आहेत. कुंभमेळा नाशिकला भरत असतो. त्यामुळं एक अध्यात्मिक शहर म्हणून नाशिकचा नावलौकीक व्हायला हवा. विकासाला अध्यात्माची जोड देवून आपण नाशिकचा विकास करू, शांतीगिरी महाराज यांनी म्हटलंय. त्यांचे अनुयायी रामानंद महाराज यांनीही शांतीगिरी महाराज यांच्या रूपाने नाशिकला एक चांगला उमेदवार मिळालेला आहे, असं म्हटलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी