33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयबैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी; सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी; सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

टीम लय भारी

मुंबई: गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रभर चर्चेत असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरील बंदीविषयी गुरुवारी सुप्रीम कोर्टात  सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींचे लक्ष लागून राहिले होते. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे(Supreme Court: Conditional permission for bullock cart race)

यापूर्वी मुंबई हायकोर्टाने शर्यतीवर बंदी कायम ठेवली होती. मात्र आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मिस युनिव्हर्स-2021 हरनाज संधू मुंबईत पोहोचली, महिलांसाठी पर्यावरणाबाबत दिले हे वक्तव्य

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले

“सुप्रीम कोर्टाचे मी आभार मानतो. बैलगाडा प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे. महाविकास आघाडीने जोर लावण्याने हा निर्णय आला आहे. दिलीप वळसे पाटील, सुनील केदार, बंटी पाटील या सर्वांना मी धन्यवाद देतो. सर्व बैलगाडा मालकांचे अभिनंदन करतो.

हा ग्रामीण भागातील लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता. तसेच महाराष्ट सरकारने जी नियमावली तयार केली आहे त्यानुसार यापुढे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येणार आहे,” अशी प्रतिक्रिया शिरुरचे खासदार अमोले कोल्हे यांनी दिली आहे.

ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण दिले जात असेल तर ते आम्ही कदापीही मान्य करणार नाही- शेंडगे

News updates from HT: Gen MM Naravane takes over as chairman of Chiefs of Staff Committee and all the latest news

पक्षाचे विचार घरोघरी पोहचवण्यासाठी सर्वांना मेहनत घ्यावी लागणार आहे. युवक हीच खरी ताकद असून युवकांनी जास्तीत जास्त काँग्रेसमध्ये सहभागी होऊऩ काँग्रेसची ताकद वाढवावी. जातीयवादी शक्तींना हद्दपार करावे. असे आवाहन केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी