27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयनितेश राणेंच्या विरोधात पुण्यात तृतीयपंथीयांचे आंदोलन

नितेश राणेंच्या विरोधात पुण्यात तृतीयपंथीयांचे आंदोलन

राजकीय नेते एकमेकांवर टीका करत असतात. राजकारणी बोलताना अतिशय खालच्या पातळीत टीका करताना दिसत आहे. यातच आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ‘हे बघा हिजड्यांचे सरदार,’ असे वक्तव्य केले होते. यामुळे राज्यभरातील तृतीयपंथी आक्रमक झाले असून नितेश राणे यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन करत आहेत. पुण्यातील बंडगाडर्न पोलीस स्टेशन समोर तृतीयपंथी समाजाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येत असून नितेश राणे यांच्या वर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये देशपांडे सभागृहात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘नागपूरला लागलेला कलंक’ अस म्हणत जहरी टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या या टिकेनंतर भाजपा नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका होत आहेत. यातच भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भाषेची पातळी सोडली आणि ठाकरे यांचा उल्लेख हिजड्यांचा प्रमुख असा केला आहे. ‘हे बघा हिजड्यांचे सरदार,’ म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचा मॉर्फ केलेला फोटो ट्विट केला आहे. त्यानंतर हा सगळा वाद सुरू झाला आहे.

नितेश राणे यांच्या या टीके विरोधात तृतीयपंथी राज्यभरात आंदोलन करत असून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी तृतीयपंथी समाजाकडून होत आहे. सरकारच्या विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली. पोलीस प्रशासन सरकारच्या दबावाला बळी पडून राणेंच्या विरोधात तक्रार दाखल करून घेत नाही असा आरोप तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्या राज्य समन्वयक शमीभा पाटील यांनी केला आहे. जोपर्यंत नितेश राणे यांच्यावर गुन्हादाखल होणार नाही तोपर्यंत आंदोलन करणार अशी भूमिका तृतीयपंथीयांनी घेतली आहे.

तसेच नितेश राणे जिथे दिसतील तिथे तोंडाला काळे फासण्यात येईल, असा इशारा तृतीयपंथीयांनी दिला आहे. नितेश राणे यांची कधी भेट झाली तर त्यांना आमचा सामना करावा लागेल त्यांना आमच्या लैंगिक समस्येवर बोलण्याचा काहीही अधिकार नाही असे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. तर नितेश राणे यांना सोज्वळपणा आणि बोलण्याची पद्धत शिकायची असेल तर त्यांनी काही दिवस हिजड्यांच्यात येऊन रहा. असे आंदोलनकर्त्यांनी राणे यांना म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा:

अर्थखात्यावर अडले विस्ताराचे घोडे; शिवसेना-भाजपाची 9 खाती अजित पवार गटाला मिळणार

सप्तशृंगी गड घाटात बस 400 फूट दरीत कोसळली; अपघातात एकाचा मृत्यू

अजित पवार यांना मंत्रालयातील 602 नंबरच्या केबिनचे भय

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी