28 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeराष्ट्रीयजाणून घ्या विजयादशमीचे महत्त्व!

जाणून घ्या विजयादशमीचे महत्त्व!

प्रभु श्री राम यांनी दुष्ट रावणाचा वध केल्याने दुष्ट प्रवृत्तीचाही अंत झाला. यानिमित्ताने विजयोत्सव साजरा करण्यासाठी दसरा सण भारतात साजरा केला जातो. या दिवशी माता दुर्गेने महिषासुराचा वध केला होता. या निमित्तानेही दसरा सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. देवी दुर्गाने महिषासुर या म्हशीच्या राक्षसावर विजय मिळवून धर्माचे रक्षण केले होते. महिषासुर राक्षसाशी देवीने नऊ दिवस युद्ध केले, दहाव्या दिवशी महिषासुराचा अंत केला. त्यामुळे नवरात्रीनंतर दसरा साजरा करण्याची परंपरा आहे. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात.

दसरा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे, म्हणून या सणाच्या दिवशी लोक नवीन वस्तू खरेदी करतात. घरातील वस्तू आणि शस्त्राची पूजा करतात. माणसे एकमेकांना सोने म्हणून आपट्याची पाने वाटून दसऱ्याच्या शुभेच्या देतात. नवरात्रीत नऊ दिवस दुर्गा माता पूजा केली जाते आणि दहावा दिवस दसरा स्वरूपात साजरा केला जातो.

विजयादशमी सणाला उत्तर, मध्य आणि पश्चिम राज्यांमध्ये या सणाला दसरा म्हणतात. या दिवशी रामलीलाची समाप्ती होते आणि प्रभु श्रीरामाने रावणावर केलेल्या विजयाचे स्मरण केले जाते. अनेक शुभ कामांची सुरुवातदेखील या दिवसापासून केली जाते.


प्राचीन काळी राजे युद्धावर जाण्यापूर्वी दसऱ्याच्या मुहूर्तासाठी आग्रही असायचे. या दिवशी श्रीरामाने असत्याचा पराभव केला. दुर्गा देवीने महिषासुर राक्षसाचा वध केला. दसऱ्याच्या दिवशी युद्धाला सुरुवात केली की त्यांचा विजय निश्चित होतो, असे मानले जात होते. युद्धावर जाण्यापूर्वी शस्त्रपूजन केले जायचे. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली.

दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून वाटली जातात. असे सांगण्यात येते की, दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करून नवीन कामांना सुरुवात केली, तर यश निश्चितच मिळते. महाभारतात खुद्द पांडवांनीही अज्ञातवास संपताच शक्तिपूजन करून शमीच्या (आपट्याच्या) झाडावरची आपापली शस्त्रे परत घेतली आणि कौरवांच्या सैन्यावर याच दिवशी हल्ला केला.

हे ही वाचा 

शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी मंत्र्यांना ‘गर्दी’ जमवण्याचे लक्ष्य

दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार?

भारत-पाकिस्तान सीमेजवळ शिवछत्रपतींचा पुतळा

छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या-नाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. वीर घरी परत आले की, दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळीत असे. घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवीत. या घटनेची आठवण म्हणून आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने आजतगायत दिली जातात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी