31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयवडेट्टीवारांची केंद्रावर खोचक टीका ,फार मोठा तीर मारला नाही

वडेट्टीवारांची केंद्रावर खोचक टीका ,फार मोठा तीर मारला नाही

टीम लय भारी

नागपूर: रशिया-युक्रेनमध्ये सध्या भयंकर युद्ध पेटल आहे. या युद्धातून लोकांना बऱ्याच गोष्टींना समोर जावे लागत आहे. भारतातील बरेच विद्यार्थी आज या युद्धात अडकले आहे. तरी यावर केंद्राचे प्रयत्न हे सुरू आहेत.  युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी अडकल्याने त्यांना मायदेशी आणण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत भारताने केवळ 900 विद्यार्थी मायदेशी आणले आहेत. (Vadettivar’s sharp criticism of the center)

यावर देखील काँग्रेसे नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्रावर खोचक टीका केली आहे. युक्रेनमध्ये 30 हजार विद्यार्थी अडकले आहेत. त्यापैकी फक्त 900 मुलांना परत आणलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने फार मोठा तीर मारला नाही, असं ते म्हणाले. सरकारने या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्याची गरज आहे. युक्रेनमध्ये 25 ते 30 हजार मुलं आहेत. 40 किमी प्रवास करून गेल्यानंतर थंडीत ते उघड्यावर झोपले. दोन विमाने आले म्हणजे सर्व विद्यार्थी आले असं होत नाही. विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागेल, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

भाजप नेते नरेंद्र मोदींना शिवाजी महाराजांपेक्षा मोठे समजतात : अतुल लोंढे

बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांतून ९ गावांचा पाणीप्रश्न सुटणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी : नाना पटोले

Ukraine-Russia crisis: 1,200 students from Maharashtra stranded, 300 have contacted kin, says Minister Vijay Wadettiwar

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी