33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी : नाना पटोले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी : नाना पटोले

टीम लय भारी

मुंबई : मुंबईकरांना आमच्या आंदोलनाचा त्रास व्हायला नको, त्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून आम्ही हे आंदोलन थांबवतो अशी घोषणा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी केली. मात्र भाजपने गुंडगिरी करत मुंबईकरांना वेठीस धरलं, असा आरोपही त्यांनी यावेळी केला(PM Modi should apologize to Maharashtra, Nana Patole).

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राबाबत केलेल्या विधानाच्या निषेधार्थ आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. त्यावरुन भाजप नेते प्रसाद लाड यांनी पटोलेंचा एकेरी भाषेत उल्लेख करत बंगल्यासमोर येवूनच दाखव, तुमच्या आंदोलनाला जशास तसे उत्तर देऊ असा इशारा दिला.

मलबार हिल येथील देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. काँग्रेसचे आंदोलक फडणवीस यांच्या घराच्या परिसरात पोहोचू नयेत याची काळजी पोलिसांनी घेत नेपेन्सी रोड येथे काँग्रेस आंदोलकांना अडवत याच ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी दिली. तसेच मलबार हिल परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसच्या रॅलीतील वारकऱ्यांचा भन्नाट किस्सा

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य

राज्यातील भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे : नाना पटोले

BJP worker bit female police official: Congress leader Nana Patole

पटोले म्हणाले की, पंतप्रधान पदावर बसलेली व्यक्ती देशाची असते, त्यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान झाल्याने मनाला तीव्र दुःख झाल्याचे ते म्हणाले. पंतप्रधानपदावर बसलेले व्यक्ती अजूनही भाजपची प्रचारक म्हणून वागत असल्याचे सांगत, हा महाराष्ट्राचा अपमान आहे, भाजपने आणि पंतप्रधानांनी जाहीर माफी मागितली पाहिजे अशी मागणी पटोले यांनी यावेळी केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी