33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयआदित्य ठाकरेंच्या ट्विटमुळे मुख्यमंत्री शिंदेंचा युरोप दौरा लांबणीवर?

आदित्य ठाकरेंच्या ट्विटमुळे मुख्यमंत्री शिंदेंचा युरोप दौरा लांबणीवर?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी जबरदस्त हल्लाबोल केला आहे. आपल्या एका ट्वीटनंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा युरोप दौरा लांबणीवर टाकल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. काल आपण ट्वीट केल्यानंतर अवघ्या 30 मिनिटांत मुख्यमंत्र्यांनी त्यांचा युरोप दौरा पुढे ढकल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी जर्मनी आणि ब्रिटनचा 10 दिवसांचा अधिकृत दौरा करत असल्याचं जाहीर केलं होतं. मुख्यमंत्र्यांचा दौरा 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार होता. पण आदित्य ठाकरेंनी काल ट्विट करत मुख्यमंत्र्यांनी त्यांचा दौरा अधिकृत असेल तर 10 दिवसांचे कार्यक्रम जाहीर करण्याचं आवाहन केले होते. एवढेच नाही तर दावोसच्या 28 तासांच्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यात तब्बल 40 कोटींचा खर्च झाल्याचाही आरोप आदित्य ठाकरेंनी या ट्वीटमधून केला होता.

त्यानंतर अचानक मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचा युरोप दौरा लांबणीवर टाकल्याचे काल स्पष्ट झाले. यावरून आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे यांना डिवचले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा दौरा पुढे ढकलला याचाच अर्थ तो सरकारी दौरा नव्हता तर मुख्यमंत्र्यांची परदेशी पिकनिक होती, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. ‘करदात्यांच्या पैशांतून घटनाबाह्य मुख्यमंत्री सुट्टीवर जात आहे, याला विरोध आहे’ असं आदित्य ठाकरेंनी आजच्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.

या अगोदर मुख्यमंत्री शिंदे दावोसच्या गुंतवणूक परिषदेला गेले होते. तिथल्या 28 तासांच्या दौऱ्यासाठी 40 कोटींचा खर्च करण्यात आला आणि त्यातून काहीही साध्य झालेले नाही, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. दावोसच्या बैठकीचा लेखाजोखा असून मांडलेला नाही, याकडेही आदित्य ठाकरेंनी लक्ष वेधले आहे.

युट्युबर एल्विश यादव एकनाथ शिंदेंच्या घरी, जितेंद्र आव्हाड भडकले..

कोण पात्र, कोण अपात्र, सुनावणी १३ ऑक्टोबरला

35 हजारांची लाच घेताना एसीबीने जात पडताळणी कार्यालयाच्या कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर आदित्य ठाकरेंनी केलेल्या या नव्या टीकेला अजून शिंदे गटाकडून उत्तर देण्यात आलेले नाही. तसेच मुख्यमंत्र्यांचा युरोप दौरा का पुढे ढकलण्यात आला, याचंही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. पण आमदार अपात्रतेची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 13 ऑक्टोबर रोजी घेणार आहेत. त्यामुळेही मुख्यमंत्र्यांनी त्यांचा दौरा लांबणीवर टाकल्याचीही चर्चा आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी