24 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरक्रिकेटWorld Cup ची वरात, पुण्याच्या दारात!

World Cup ची वरात, पुण्याच्या दारात!

भारतात होणारा क्रिकेटचा महासंग्राम अर्थात ODI वर्ल्डकपला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. स्पर्धेसाठी सर्व संघ कसून तयारी करत असून क्रिकेट फॅन्सदेखील आपल्या देशाच्या संघाला सपोर्ट करायला उत्सुक आहेत. आतापासूनच क्रिकेटचा रंग वातावरणात पसरायला सुरुवात झाली असून पुढील महिनाभर देशातील वातावरण क्रिकेटमय होणार आहे. क्रिकेट वर्ल्डकप सारख्या मोठ्या इवेंटसाठी सर्व संघ, क्रिकेट चाहते यांच्यासोबतच आयोजकही तयार आहेत. यंदा वर्ल्डकप भारतात असल्यामुळे बीसीसीआय कसून तयारीला लागली आहे. प्रत्यक्ष वर्ल्डकप सुरू होण्याआधी भारतातील विविध शहरांमध्ये वर्ल्डकपच्या ट्रॉफी टूरचे आयोजन करण्यात आले आहे. आज मंगळवारी (26 सप्टेंबर) या ट्रॉफी टूरचे आयोजन पुणे शहरात करण्यात आले आहे. त्यामुळे, आता पुणेकरांना वर्ल्डकप ट्रॉफीचे दर्शन अगदी जवळून घेत येणार आहे.

पुण्यामध्ये तब्बल 27 वर्षांनंतर वर्ल्डकपचे सामने आयोजित होणार आहेत. त्या अनुषंगाने, पुण्यातील क्रिकेट चाहत्यांना वर्ल्ड कप ट्रॉफी जवळून पाहता यावी यासाठी बीसीसीआय कडून आज मंगळवारी, ट्रॉफी टूरचे आयोजन करण्यात आले आहे. या ट्रॉफी टूर साठी एक स्पेशल निळ्या रंगाची ओपन बस वापरली जाणार असून सोशल मिडियावर बस चे फोटोज वायरल होत आहेत.

हे ही वाचा 

सचिन तेंडुलकरांसाठी बच्चू कडूंची भीकपेटी

ऑस्ट्रेलियाला नमवून भारताने केले अनोखे विक्रम

वर्ल्डकपसाठी टीम इंडिया सज्ज, वनडे सह तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल

मंगळवारी दुपारी 1 वाजल्यापासून ट्रॉफी टूरला हॉटेल जेडब्ल्यू मॅरिअट येथून सुरुवात होणार असून सेनापती बापट रोड – सिंबोयसिस कॉलेज – बीएमसीसी – फर्ग्युसन रस्ता ते कृषी महाविद्यालय या मार्गावरून ह्या ट्रॉफीचे मार्गक्रमण होईल. यानंतर कृषी महाविद्यालयात संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत प्रदर्शनासाठी ठेवण्यात येईल.


याबद्दल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, “#ICC_World_Cup_Trophy चा मी पुण्यात काढलेला आजचा हा पहिला फोटो आहे…. असाच फोटो तुम्हीही काढू शकता त्यासाठी आज दुपारी १ वाजता Hotel JW Marriott पासून सेनापती बापट रोड – Symbiosis College – BMCC – फर्ग्युसन रस्ता ते कृषी महाविद्यालय या मार्गावरून देशात प्रथमच काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत सहभागी व्हायला विसरू नका… तसंच कृषी महाविद्यालयात सायंकाळी ४ ते ६ या वेळेत ही ट्रॉफी ठेवण्यात येणार आहे. ती बघायलाही जरूर या.. चला पुण्यात अभिमानाने #ICC_World_Cup #ट्रॉफी मिरवूया…”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी