30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeटॉप न्यूजशरद पवारांसोबत ४८ आमदार, अजितदादांकडे उरले पाच जण

शरद पवारांसोबत ४८ आमदार, अजितदादांकडे उरले पाच जण

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीत ५० आमदार उपस्थित राहिले आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत अवघे चार – पाच आमदार उरले आहेत. त्यामुळे अजित पवार यांचे बंड फसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

अजित पवार यांच्याबरोबर गेलेले राष्ट्रवादीचे आणखी एक आमदार परत आणण्यात यश मिळाले आहे. शरद बनसोडे असे या आमदारांचे नाव आहे. मुंबई विमानतळावरून त्यांना परत आणण्यात आले आहे. शशिकांत शिंदे, एकनाथ शिंदे व मिलिंद नार्वेकर या तिघांसोबत बनसोडे यांना परत आणले आहे. याबाबत बनसोडे यांनी मी कुठेही गेलेलो नव्हतो. मी शरद पवार साहेब यांच्याबरोबरच आहे, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

राष्ट्रवादीचे आणखी एक आमदार दिलीप बनकर नाशिकमध्ये आपल्या घरी पोचले आहेत. त्यावेळी ते म्हणाले की, आम्हाला रात्री पावणे बारा वाजता फोन आला होता. त्यानुसार आम्ही गेलो. आम्ही १० आमदार राजभवनावर गेले होतो. तिथे शपथविधी झाला. शपथविधीनंतर मी नाशिकला आलो. माझ्या मुलाची तब्येत बिघडली म्हणून नाशिकला आलो. येताना माझे पवार साहेबांशी बोलणे झाले. सुप्रियाताईंशीही माझे बोलणे झाले. आम्ही पक्षाबरोबर आहोत. मी पक्षाबरोबर राहण्याचे ठरविले आहे. माझ्यावर शरद पवार यांचा विश्वास आहे, असाही त्यांनी दावा केला.

अजित पवारांची अखेर हकालपट्टी, सगळे अधिकार शरद पवार व जयंत पाटील यांच्याकडे

अजित पवारांची विधीमंडळ अध्यक्षपदावरून आमदारांच्या बैठकीत हकालपट्टी करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच व्हीप काढण्याबाबतचे अजित पवारांचे अधिकारही रद्द करण्यात आले. अजित पवार यांनी पक्षाचा शिस्तभंग केला आहे. त्यामुळे  त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार शरद पवार व जयंत पाटील यांच्याकडे दिले आहेत. यापुढे आमदारांची कोणतीही बैठक बोलावायची असेल किंवा काही संवैधानिक बाबी असतील तर त्याबाबतचे अधिकार जयंत पाटील यांच्याकडे दिले आहेत. आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील राजकीय नाट्य आता सर्वोच्च न्यायालयात

महाराष्ट्रातील राजकीय नाट्याने देशात धमाका उडाला आहे. हा राजकीय खेळ आता सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोचला आहे. काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने नव्या सरकारविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका तातडीने सुनावणीला यावी यासाठी याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निबंधक कार्यालयाकडे मागणी केली आहे. राजभवनमध्ये पार पडलेला शपथविधी सोहळा चुकीच्या पद्धतीने आयोजित केलेला आहे. अजित पवार यांनी सादर केलेले बहुमताचे पत्र चुकीचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन तातडीने बोलवावे. अजित पवार यांचे पत्र चुकीचे आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन तातडीने बोलवावे. तातडीने बहुमताची परीक्षण करावे. व्हिडीओद्वारे चित्रीकरण करावे, अशा मागण्या या याचिकेत करण्यात आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

फोटो फिचर : फडणवीस, पवार यांचा असा रंगला शपथविधी सोहळा

राष्ट्रवादीचे सहा आमदार लंपास, इतर आमदारांना वाचविण्याचे प्रयत्न

शरद पवार यांना एका संतप्त कार्यकर्त्याचे पत्र

शरद पवारांची खेळी, अजित पवारांना एकटे पाडण्यासाठीचे प्रयत्न सुरू; अजित पवारांचा मुक्काम श्रीनिवास पवारांच्या घरात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी