33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूजCorona Effect : उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर बहिष्कार

Corona Effect : उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर बहिष्कार

Corona Effect  कोरोनाची लागण होण्याची सोसायटीधारक आणि घरमालकांमध्ये भीती

लय भारी टीम

मुंबई/नवी दिल्ली : कोरोनाग्रस्त ( Corona Effect ) रुग्णांवर उपचार करणा-या आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांना सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागत आहे. कोरोना विरोधातील लढाई लढताना आरोग्य कर्मचारी हेच खरे देवदूत आहेत. मात्र, त्यांच्यामुळे आपल्यालाही कोरोनाची लागण होईल, अशी भीती सोसायटीधारक आणि घरमालकांमध्ये पसरली आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांवर बहिष्कार ( Corona Effect ) घातला जात आहे. त्यांना घर सोडण्याची धमकी दिली आहे.

आपल्या घरात भाड्याने राहणा-या डॉक्टर, नर्सेसवर त्यांचे घरमालक घर सोडून जाण्यासाठी दबाव टाकत असल्याचे समोर आले आहे. याची तक्रार ‘एम्स’च्या डॉक्टरांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केली आहे. ‘घरमालक घर सोडण्यासाठी दबाव टाकत आहेत. केवळ डॉक्टर नाही तर नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफसोबतही असा दुर्व्यवहार सुरू आहे’ असे ‘एम्स’च्या ‘रेसिडन्ट डॉक्टर वेल्फेअर असोसिएशन’ने दिलेल्या पत्रात म्हटले आहे. जवळपासचे लोक त्यांच्याकडे करोना संदिग्ध म्हणून पाहत आहेत.

अशा घटनांमुळे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

Corona Effect : उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर बहिष्कारजनता कर्फ्यूच्या वेळी सायंकाळी ५ वाजता आरोग्य कर्मचा-यांच्या कामाचा आपण सर्वांनी थाळ्या, टाळ्या आणि घंटानिनाद करत गौरव केला. त्यांच्या कामाचे कौतुक केले. आपला जीव धोक्यात घालून ते इतरांचा जीव वाचवत आहेत. मात्र, काहीजण त्यांना प्रोत्साहन द्यायचे सोडून त्रास देत आहेत. अशा घटना दिल्ली, नोयडा, वारंगळ, चेन्नईमधून समोर येत आहेत. त्यांना घर सोडण्याची धमकीही देत आहेत. त्यामुळे दु:खी झालो – आरोग्य मंत्री हर्षवर्धन

निवासी डॉक्टरांची सुरक्षिततेची मागणी

एकीकडे सामाजिक बहिष्कार तर दुसरीकडे निवासी डॉक्टरांना कोरोना प्रतिबंधक ( Corona Effect ) किट आणि मास्क उपलब्ध होत नसल्याबद्दलही चिंता व्यक्त केली जात आहे. वैद्यकीय उपचार करणारे डॉक्टर आणि निवासी डॉक्टरांसोबत काम करणारे वैद्यकीय कर्मचारी तसेच सफाई कर्मचारी यांच्याही जीवाला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, असे ‘मार्ड’चे म्हणणे असून, रुग्णालयात पोषक आहाराची समस्याही असल्याचे निवासी डॉक्टरांनी निदर्शनास आणून दिले आहे.

कोरोनाचा ( Corona Effect ) वाढता फैलाव रोखण्यासाठी पालिका रुग्णालयांमध्ये कोरोना तपासणी केंद्रांसह तापासाठीची ओपीडीही सुरू करण्यात आली. या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले अनेक निवासी डॉक्टरही अहोरात्र काम करत आहेत. मात्र, या डॉक्टरांना कोरोना प्रतिबंधक पोशाख आणि मास्क अद्याप देण्यात आले नसून, ते केवळ कोरोना केंद्रांतील रुग्णांची तपासणी करणा-या डॉक्टरांना देण्यात आले आहेत. त्यामुळे निवासी डॉक्टरांच्या जिवाला धोका ( Corona Effect ) असल्याची भीती निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ या संघटनेने व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

Coronavirus Pandemic : उद्धव ठाकरे यांना अनावृत्त पत्र

Coronavirus चा अमेरिकेत उद्रेक : पंधरा दिवसांत 900 वरून 53 हजार रूग्णांची वाढ

भारत सरकारचा Video : कोरोना व्हायरसची लक्षणे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी