34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजDevendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा २३ वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत निघणार!

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा २३ वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत निघणार!

टिम लय भारी

तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था) : केरळमध्ये नुकत्याच महापालिका आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीमध्ये तिरुवनंतपुरम महापालिकेत मुडवणमुगल वार्डातून आर्या राजेंद्रन ही 21 वर्षीय तरुणी विजयी झाली आहे. ती आता तिरुवनंतपुरम महापालिकेची महापौर होणार आहे. आर्या राजेंद्रननं महापौर पदाची शपथ घेतल्यानंतर ती महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा विक्रम मोडणार आहे. देवेंद्र फडणवीस वयाच्या 27 व्या वर्षी महापौर झाले होते. देशातील सर्वात तरुण महापौर होण्याचा विक्रम फडणवीसांच्या नावावर आहे.

आर्या राजेंद्रन भारतातील सर्वात तरुण महापौर होणार आहे. ती सध्या ऑल सेंटस कॉलेजमध्ये बीएस्सी मॅथ्सचे शिक्षण घेत आहे. आर्या राजेंद्रन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून निवडणुकीत विजयी झाली असून ती स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाची राज्य कार्यकारिणीची सदस्य देखील आहे. आर्या राजेंद्रन सीपीएमच्या ब्रँच कमिटी सदस्य असून बालाजनसंघम प्रदेशाची अध्यक्ष आहे. आर्याचे वडील इलेक्ट्रिशीयनचे काम करतात. तर, तिची आई श्रीलथा एलआयसी एजंट म्हणून काम करते. केरळमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये डाव्या पक्षांच्या लेफ्ट डेमोक्रॅटीक फ्रंटने विजय मिळवला आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत एलडीएफ प्रथम क्रमांकावर, काँग्रेस दुस-या क्रमांकावर राहिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी