29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeटॉप न्यूजधनंजय मुंडेंच्या जीविताला धोका, महिलेकडे आढळले बेकायदेशीर पिस्तूल

धनंजय मुंडेंच्या जीविताला धोका, महिलेकडे आढळले बेकायदेशीर पिस्तूल

टीम लय भारी

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जाहीर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या मुंडेंच्या घरी जाण्यास निघाल्या असता पोलिसांना त्यांच्या गाडीत बेकायदेशीर पिस्तुल आढळले आहे (Dhananjay munde posted on facebook that karuna sharma to kill munde family).

चौकशीअंती त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. परंतु परळी येथील शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. करुणा यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी या महिलांकडून केली जात आहे.

रस्ते सुधारणीसाठी ६ कोटींचा निधी जाहीर, विजय वडेट्टीवारणी केले भूमिपूजन

व्यापारी असोसिएशनच्या विकासकामांसाठी आमदार रोहित पवारांनी दिले निधीचे आश्वासन

न्यायालयात तसेच फेसबुकच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. धनंजय मुंडेंची बदनामी तर केलीच परंतु करुणा त्यांच्या जीवावर उठल्याचे या प्रकारातून उघड होत आहे.

वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेऊन पत्रकार परिषद घेणार आणि त्यानंतर आपला मोर्चा धनंजय मुंडेंच्या घरी वळवणार असे स्वतः करुणा शर्मा यांनी जाहीर केले होते. मुंडेंना उध्वस्त करणार, संपावणार अशी भाषा करणाऱ्या करुणा यांच्याकडे हे पिस्तुल कुठून आले असाही प्रश्न उपस्थित होतो.

जयंत पाटलांनी मोटार सायकलवरून केला प्रवास, चिखलातूनही गेले चालत

Dhananjay munde
धनंजय मुंडेंच्या जीविताला धोका, महिलेकडे आढळले बेकायदेशीर पिस्तूल

Dhananjay Munde suffers setback as his upward surge halted by controversy

मुंडे यांच्या जीवाचे बरेवाईट करण्यासाठी, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा घातपात करण्यासाठी की स्वतःच्या बचावासाठी किंवा आणखी कोणत्या कारणास्तव हे पिस्तुल त्यांनी आपल्या जवळ बाळगले हा प्रश्न आहे. यावर आता पोलीस काय प्रतिक्रिया देतात ही उत्सुकता आहेच.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी