27 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
Homeटॉप न्यूजभाजपचे दिग्गज गॅसवर, अनेकांचे कापले पत्ते

भाजपचे दिग्गज गॅसवर, अनेकांचे कापले पत्ते

मुंबई : भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. एकनाथ खडसे, चंद्रकांत बावनकुळे, प्रकाश महेता, विनोद तावडे या दिग्गज आजी – माजी मंत्र्यांना गॅसवर ठेवले आहे. या मान्यवरांचा यादीत समावेश नाही. पुण्यात कोथरूड मतदार संघातून मेधा कुलकर्णी यांचे नाव वगळले आहे. तेथून चंद्रकात पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

 

भाजपचे दिग्गज गॅसवर, अनेकांचे कापले पत्ते

भाजपचे दिग्गज गॅसवर, अनेकांचे कापले पत्तेभाजपचे दिग्गज गॅसवर, अनेकांचे कापले पत्तेभाजपचे दिग्गज गॅसवर, अनेकांचे कापले पत्ते

मुलुंड येथे मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. सरदार तारासिंग यांचा पत्ता कापला आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या कालिदास कोळंबकर यांना वडाळ्याचे तिकीट दिले आहे. पुणे कॅन्टोन्मेंटमधून सुनील कांबळे यांना संधी दिली आहे. दिलीप कांबळेंचे तिकिट कापले आहे. मंदा म्हात्रे यांना बेलापूरमधून तिकीट मिळाले आहे. संदिप नाईक यांना ऐरोलीमधून संधी मिळाली आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले जयकुमार गोरे यांना माण मतदारसंघाचे तिकिट दिले आहे. कराडमधून पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधा अतुल भोसले यांना तिकिट दिले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी