31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजसुपारीमुळे भारताचे 15 हजार कोटींचे नुकसान...

सुपारीमुळे भारताचे 15 हजार कोटींचे नुकसान…

टीम लय भारी

मुंबई :- डोळ्यासही छोटी दिसणाऱ्या सुपारीने भारताला तब्बल 15 हजार कोटींचा चुना लावला आहे. सुपारी श्रीलंके मधून आयात केली आहे असे कागदोपत्री दाखवून सुपारी इंडोनेशियातून आणि इतर ईशान्य आशियाई देशातून आयात करण्यात आली होती (India loss of Rs 15,000 crore due to betel nut).

भारतात मुंबई, नागपूर, अहमदाबाद, जयपूर, कोलकाता, बंगळुरु येथे सुपारीच्या मोठ्या बाजार पेठा आहेत. दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना (SARC) ही आर्थिक आणि राजकीय मदत व्हावी म्हणून 8 देशांनी एकत्र येऊन तयार केली. भारत हा या संघटनेचाच एक सदस्य आहे. या 8 देशांनी एकत्र येत आपापसातील व्यापार वाढवण्यासाठी साफता (south Asian Free Trade Area) हा करार केला.

मोदी है तो महंगाई है, रुपाली चाकणकरांचा मोदींना खोचक टोला

राज्यपालांच्या पत्राला उद्धव ठाकरेंचे सडेतोड उत्तर

साफता या करारानुसार भारतीय व्यापाऱ्यानी सार्क या देशांतून सुपारी आयात केल्यावर त्यांना 13% कस्टम ड्युटी द्यावा लागतो, तर सार्क देशांव्यतिरिक्त सुपारी आयात केली की 113% कस्टम ड्युटी लागते.

भारतात आलेली ही सुपारी श्रीलंकेतील नसून इंडोनेशियातील असल्याचे समजते. इंडोनेशियातून चांगल्या सुपाऱ्या आयात न करता खराब सुपाऱ्या आयात केल्या गेल्या. इंडोनेशियातील सुपाऱ्या या स्वच्छ नसून त्या स्वच्छ करण्यासाठी रसायन आणि अँसिडचा वापर केला जातो. त्यामुळे ही तयार झालेली सुपारी आरोग्यास हानिकारक बनते (Betel nut is harmful to health).

India loss of Rs 15,000 crore due to betel nut
सुपारी

सोनू सूद देणार मोफत CA चे शिक्षण; या साइटवर जाऊन करा अर्ज

₹ 65 Crore In Assets Linked To Ajit Pawar Attached In Maharashtra Bank Scam Case

आता या सर्व प्रकरणात सीबीआय चौकशी सुरू झाली असून भारतात 17 ठिकाणी सर्चींग ऑपरेशन चालू आहे. या सुपारी घोटाळ्यात व्यापाऱ्यांसह, कस्टम ड्युटीचे आणि सेंट्रल एक्साईजचे काही अधिकारी सहभागी असल्याचे ही समजते (It is understood that some officials of customs duty and central excise, including traders, were involved in the betel nut scam).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी