29.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रसर्व पक्षीय चोरांचा शेतकऱ्यांच्या दौलतीवर दरोडा

सर्व पक्षीय चोरांचा शेतकऱ्यांच्या दौलतीवर दरोडा

टीम लय भारी

कोल्हापूर :- सर्व पक्षीय चोरांनी कारखाने विकत घेऊन शेतकऱ्यांच्या दौलतीवर दरोडा टाकल्यासारखे आहे अशी संतापजनक प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली (Former MP Raju Shetty president of the farmers association, gave the information).

चंद्रकांत दादांच्या पत्रावरूनच अनेक साखर कारखानांची चौकशी झाली. दादा स्वच्छ चारित्र्याचे असतील तर त्यांनी उर्वरित इतर ४१ साखर कारखानांची सुद्धा चौकशी लावावी अशी मागणी  राजू शेट्टी यांनी आज शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार बैठकीत सुनावले (Raju Shetty said this at a press conference held at Government Rest House here today).

सुपारीमुळे भारताचे 15 हजार कोटींचे नुकसान…

मोदी है तो महंगाई है, रुपाली चाकणकरांचा मोदींना खोचक टोला

ईडीने राज्यातील कोटयवधी रुपये किमतीचे ४२ साखर कारखाने कवडी मोल दराने विकून कोट्यवधी रुपयांचा दरोडा टाकला आहे. पाच वर्षे झोपलेली ईडी आता अचानक कशी जागी झाली असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला (He raised the question of how ED, who had been sleeping for five years, suddenly woke up).

कर्ज देणारे, घेणारे, त्याला मंजुरी देणारे, त्यांचा लिलाव करणारे आणि घेणारेही तेच आहेत. हेच कारखाने शेतकरी, कामगार, वाहतूकदार यांचे लाखो रुपयांची देणी द्यायची बाकी आहेत. ते कवडीमोल दराने विकल्याने ते सर्व बुडाल्याचे दिसून येते. सरळ सरळ हे कारखाने विकताना शेतकऱ्यांना लुटण्याचे काम केले आहे (He has robbed the farmers by selling these factories).

Former Raju Shetty president of the farmers association
राजू शेट्टी

राज्यपालांच्या पत्राला उद्धव ठाकरेंचे सडेतोड उत्तर

महाराष्ट्र में औने-पौने दाम पर बेच दी गईं 43 शुगर मिलें, राजू शेट्टी ने लगाए गंभीर आरोप

विक्री झालेल्या कारखान्यांनी शेतकऱ्यांचे शेअर्स, ठेवी रक्कम परत दयाव्यात. दादा जर स्वछ चारित्र्याचे असतील तर त्यांनी उर्वरित ४१ साखर कारखान्यांची चौकशी लावावी अशी मागणी शेट्टी यांनी केली. तसेच हे कारखाने परत शेतकऱ्याला परत मिळवून दिल्याशिवाय आपला लढा थांबणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले (He also clarified that his fight will not stop until the factory gets the farmer back).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी