31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयमोदी है तो महंगाई है, रुपाली चाकणकरांचा मोदींना खोचक टोला

मोदी है तो महंगाई है, रुपाली चाकणकरांचा मोदींना खोचक टोला

टीम लय भारी

मुंबई :- पेट्रोल-डिझेल दर वाढीनंतर आता गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ झाली आहे. या महागाईने सामान्य माणसाचे कंबरडे मोडणार आहे. घरगुती सिलेंडरचे दर 25 रुपयांनी वाढले आहेत. यावर राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मोदींना मजेशीर पण खोचक शब्दात टोला लगावला आहे (Rupali Chakankar has slammed Modi in funny but sarcastic words).

घरगुती सिलेंडरचे दर 25 रुपयांनी वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. “मोदी है तो महंगाई है” असे हॅशटॅग वापरत राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर  यांनी ट्विट केले आहे. यात त्या म्हणाल्या आहेत की, ‘ना खाऊँगा ना खाने दूँगा’, गैस सिलेंडर इतना मेहंगा कर दूँगा, की पकाने भी नहीं दूँगा’ #मोदीहैतोमहंगाईहै असा हॅशटॅग वापरत शायराना अंदाज मध्ये मोदींना टोला लगावला आहे (Shairana has put a toll on Modi in the forecast).

राज्यपालांच्या पत्राला उद्धव ठाकरेंचे सडेतोड उत्तर

सोनू सूद देणार मोफत CA चे शिक्षण; या साइटवर जाऊन करा अर्ज

यानंतर महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांनी ट्विटद्वारे मोदींना टोला लगावला आहे. नितीन राऊत ट्विटमध्ये म्हणाले की, इतना तेजी से ‘विकास’ की उम्मीद तो नरेंद्र मोदी जी से किसी ने नहीं की थी। पर उन्होंने करके दिखा दिया। शाबाश मोदी जी, जनता को जीने मत दीजिएगा। या ट्विटसोबत #BJPLootingindia असा हॅशटॅग त्यांनी वापरत, अशा मजेशीर शब्दात मोदींना टोला लगावला आहे (Using such a hashtag, he has slammed Modi with such funny words).

घरगुती सिलेंडरचे दर 25 रुपयांनी वाढले आहेत. आधीच इंधनाची दरवाढ झाल्यामुळे  सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसलीय. त्यात आता घरगुती सिलिंडरचा दर वाढल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे. नवीन दर वाढीनुसार 14 किलोचा सिलेंडर आता 834 रुपयांना मिळणार आहे, तर 19 किलोच्या सिलेंडरमध्ये 76 रुपयांची वाढ झाली आहे. या सततच्या वाढत्या महागाईमुळे देशातील जनता त्रस्त झाली आहे (The people of the country are suffering due to this rising inflation).

पडळकरांविरोधात रोहित पवारांची थेट मोदी-नड्डांकडे ट्विटद्वारे तक्रार

LPG cylinder price hiked by Rs 25.50 from July 1

Rupali Chakankar has slammed Modi in sarcastic words
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रूपाली चाकणकर

मे 2014 मध्ये भाजपचे सरकार सत्तेत आले होते. त्यावेळी घरगुती एलपीजी सिलेंडर दर हे 414 रुपये होता. मोदी सरकारला सत्तेत येऊन आठवे वर्ष सूरु आहे. आज घरगुती LPG सिलेंडरचा दर हा 834 रुपये आहे. मोदी सरकारच्या काळात महागाई वेगाने वाढत चाली आहे. अच्छे दिन कधी येणार असा प्रश्न देशातील जनता मोदींना करत आहे (The people of the country are asking Modi when the good days will come).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी