30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रआणखी सात बुलेट ट्रेनचा प्रकल्प ; ‘या’मार्गांचा समावेश

आणखी सात बुलेट ट्रेनचा प्रकल्प ; ‘या’मार्गांचा समावेश

टीम लय भारी

मुंबई: वेगवान प्रवासासाठी मुंबई ते अहमदाबादव्यतिरिक्त देशभर आणखी सात ठिकाणी बुलेट ट्रेनचे मार्ग उभारण्यात येणार आहेत. त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने दिली.( Another seven bullet train projects)

राज्यातील दोन महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या, तसेच मुंबई- नाशिक-नागपूर आणि मुंबई -पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेनचाही त्यात समावेश आहे. त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल सहा महिन्यांत सादर होईल.

कोरोनानंतर मेट्रोच्या सर्वाधिक प्रवासी संख्येची नोंद

अक्षय कुमारला पुन्हा कोरोनाचा फटका! ‘पृथ्वीराज’ ट्रेलर लांबणीवर!

 मुंबई-नाशिक -नागपूर या ७३६ किलोमीटर मार्गाचेही एरियल लिडार सर्वेक्षण सुरू आहे. प्रकल्पाचे रेखाचित्र, पर्यावरणावरील आणि सामाजिक परिणाम यांसह अन्य सर्वेक्षण कामेही केली जात आहेत. ही ट्रेन मुंबई ते नागपूर दरम्यान ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा या जिल्ह्यातून धावणार आहे. बुलेट ट्रेनने हाच प्रवास चार तासांत होणार आहे.

मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेन मार्ग राज्यातील ठाणे, रायगड, पुणे, सोलापूर या चार जिल्ह्यातून जाणार आहे. तर कर्नाटकातील गुलबर्गा आणि तेलंगणातील तीन जिल्ह्यांतून ट्रेन धावेल. या दोन्ही बुलेट ट्रेन मार्गिकांसाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सरू आहे. येत्या सहा महिन्यात ते पूर्ण होईल, असे नॅशनल रेल्वे हायस्पीड कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक सतीशचंद्र अग्निहोत्री यांनी सांगितले.

मेट्रो 3 आणि 6 च्या कारशेडसाठी गोरेगाव पहाडी भागाचा विचार व्हावा – उद्धव ठाकरे

Bullet train project: Work gets into the fast lane

मुंबई ते अहमदाबाद  व्यतिरिक्त आणखी सात ठिकाणी बुलेट ट्रेनचे नियोजन आहे. सहा मार्गिकांसाठी  प्रकल्प अहवाल तयार करण्याचे कामही सुरु  आहे. तर अयोध्येतून जाणाऱ्या ९४२ किलोमीटर अशा सर्वाधिक लांबीच्या दिल्ली ते वाराणसी बुलेट ट्रेनचा सविस्तर प्रकल्प अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे.

नवे मार्ग (कंसात लांबी- किमी)

*  मुंबई ते नागपूर  (७४०)

*  दिल्ली ते अहमदाबाद (८८६)

*  दिल्ली ते अमृतसर  (४५९)

*  मुंबई ते हैदराबाद (७११)

*  चैन्नई ते म्हैसूर (४३५)

*  वाराणसी ते हावडा (७६०)

* दिल्ली ते वाराणसी (९४२)

रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याकडून आढावा

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही  मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. मुंबई दौऱ्यावर असलेल्या दानवे यांनी नॅशनल रेल्वे हायस्पीड कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी