28 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeटॉप न्यूजइंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल!

इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल!

टीम लय भारी

संगमनेर : सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. इंदुरीकर महराज यांनी महिलाबाबत अक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात (PCPNDT) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराजांना चांगलाच झटका बसला आहे.

‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यासंदर्भात त्यानंतर महाराजांबद्ल संताप व्यक्त करण्यात आला होता. ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आली होती तसेच कारवाईची मागणीही करण्यात आली होती. इंदुरीकर महराज यांच्याविरोधात १९ जून रोजी संगमनेर कोर्टात गुन्हा दाखल झाला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या रंजना गावंदे यांनी केली होती तक्रार…

इंदुरीकर यांनी PCPNDT कायद्याच्या कलाम २२ चं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्यानुसारत अहमदनगर येथील PCPNDT च्या सलागर समितीच्या सदस्यांनी त्यांना नोटीसही पाठवली होती. त्या नोटीसला इंदुरीकर महाराज यांनी आपल्या वकिलांमार्फत बाजू मांडत उत्तर दिलं होतं. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या रंजना गावंदे यांनी नोटीस दिली हाती. त्यामध्ये प्रशासनाने गुन्हा दाखल न केल्यास तुम्हालाही दोषी धरण्यात येईल, असंही म्हटले होते. त्यानंतर इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी