31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजउल्हासनगर महापालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

उल्हासनगर महापालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

टीम लय भारी

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्यावर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी जन्म तारखेत फेरफार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा ठराव शुक्रवारच्या महासभेत मंजूर करण्यात आला असून , प्रशासनाच्या वतीने उपायुक्त मुख्यालय अशोक नाईकवाडे यांनी हा ठराव महासभेसमोर ठेवण्यात आला आहे(Ulhasnagar Municipal Corporation, case filed against the public relations officer).

आणि या ठरावाला मंजूरी मिळाल्याने युवराज भदाणे अडचणीत आले आहेत. या अन्यायाविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप मालवणकर यांनी युवराज भदाणे यांची तक्रार पालिकेकडे केली होती. त्यानुसार समितीने २७ ऑक्टोबर २०२१ रोजी आपला अहवाल आयुक्तांकडे सादर केला होता. त्यात भदाणेंच्या प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शैक्षणिक संस्थांच्या अभिलेखात १ जून १९७० ही नोंद असल्याचे उघड झाले, पण शाळा सोडल्याचा दाखला महात्मा गांधी शाळेचा दर्शवून आर. के. तलरेजा महाविद्यालयामार्फत त्यात फेरफार करून १ जून १९७२ अशी जन्मतारीख नमूद करण्यात आले होते. त्यामुळे युवराज भदाणे यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा शासकीय प्रस्ताव शुक्रवारी महासभेसमोर ठेवण्यात आला आहे.

या प्रस्तावाला शिवसेना नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर यांनी विरोध करताना चौकशी समितीवरच भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्याला उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी उत्तर देताना पुरावे सादर करा, त्याचीही चौकशी करू असे सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

अभाविप मुंबईच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पस मध्ये आंदोलन

जुन्या पेन्शनसाठी राज्य कर्मचाऱ्यांचा दोन दिवस संप

नारायण राणेंच्या अनधिकृत बंगल्यावर कारवाईचे आदेश

Maharashtra: Municipal corporation level committee to be set up for monitoring power distribution

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी