28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeटॉप न्यूजSBI Recruitment 2020 : पदवीधरांसाठी एसबीआयमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, 8500 अ‍ॅपरेन्टीस पदांवर...

SBI Recruitment 2020 : पदवीधरांसाठी एसबीआयमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, 8500 अ‍ॅपरेन्टीस पदांवर निघाली व्हॅकन्सी

टीम लय भारी

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने अ‍ॅपरेन्टीससाठी 8 हजार 500 पदांवर योग्य उमेदवारांकडून अर्ज (SBI Recruitment 2020) मागवले आहेत. कोणत्याही युनिव्हर्सिटी किंवा संस्थेतून पदवी प्राप्त उमेदवार या पदांसाठी अप्लाय करू शकतात. या पदांवर निवड लेखी परीक्षेच्या माध्यमातून होईल आणि कोविडमुळे मुलाखती घेतल्या जाणार नाहीत. निवडलेल्या उमेदवारांना ती वर्षांचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे.

या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुदत 10 डिसेंबर 2020 पर्यंत आहे. या रिक्रूटमेंट ड्राइव्ह अ‍ॅपरेन्टीस पदासाठी आहेत, एसबीआयच्या एम्प्लॉई पदासाठी नाही.

किमान पात्रता

या पदासाठी शैक्षणिक पात्रता प्राप्त संस्थेतून पदवी पास असणे आवश्यक आहे. तरसेच वय 31 डिसेंबर 2020 ला 20 ते 28 वर्षाच्या दरम्यान असावे. मात्र, आरक्षणानुसार वयात सूट असेल.

राखीव वर्गासाठी अर्ज शुल्क नाही तर इतर उमेदवारांसाठी 300 रुपये शुल्क आहे.

इतर माहिती

एसबीआय बँकेच्या अ‍ॅपरेन्टीस पदासाठी होणा-या लेखी परीक्षेची तारीख अद्याप ठरलेली नाही, सूत्रांच्या महितीनुसार परीक्षा जानेवारी 2021 मध्ये होण्याची शक्यता आहे.

या पदांवर निवड झाल्यानंतर उमेदवाराला पहिल्यावर्षी प्रति महिना 15,000 रुपये स्टायपेंड मिळेल. दुस-या वर्षी ती वाढून 16,500 करण्यात येईल. तर अंतिम वर्षात स्टायपेंड 19,000 केली जाईल.

परीक्षेच स्वरूप

या पदांवर निवडीसाठी होणा-या लखी परीक्षेत जनरल/फायनान्शियल अव्हेयरनेस, क्वांटिटेटिव्ह अप्टीट्यूड, जनरल इंग्लिश, रिजनिंग अबिलिट आणि कम्प्यूटर अप्टीट्यूडमधून प्रश्न असतील. परीक्षा एकुण 100 गुणांची होईल. अर्ज केवळ ऑनलाइनच करता येईल. सविस्तर माहितीसाठी एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर पहावे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी