30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूजएलआयसीने दिला 1 करोड 8 लाखाचा जीवन विमा

एलआयसीने दिला 1 करोड 8 लाखाचा जीवन विमा

टीम लय भारी

मुंबई : हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या एलआयसी पॉलिसी धारकाच्या कुटुंबीयांना एक करोड आठ लाखाचा विमा दिला आहे, अशी माहिती एलआयसीच्या फोर्ट शाखेतील विमा प्रतिनिधी श्री. राजपाल बिराजदार यांनी दिली. मागील दोन वर्षापासून कोरोना मुळे अनेकांची नोकरी धंदा आणि व्यवसायावर गदा आली होती. काम बंद असूनही दोन वर्ष ऑफिस भाडे आणि स्टाफचा पगार देणे जमत नव्हते. एकदम निरोगी व तंदुरुस्त शरीर असूनही केवळ ट्रेसमुळे हृदयविकाराचा झटका येऊन एका व्यावसायिकाचा मृत्यू झाला होता(LIC provides life insurance of Rs 1crore 8 lakh).

संबंधित पॉलिसी धारकाचे पत्नी आणि भावाने त्याचा बिजनेस चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्यात यश आले नाही. घरातील एकमेव कमावती व्यक्ती अचानकपणे गेल्यामुळे मुलींचे शिक्षण लग्न संपूर्ण जीवनभराची आर्थिक सोय त्यांच्या पुढे फार मोठं संकट येऊन ठाकलं होतं. पतीच्या निधनानंतर घरातील कागदपत्रांची छाननी केल्यानंतर आपण एलआयसी पॉलिसी काढले असल्याचे त्यांच्या पत्नीला लक्षात आले.

LIC provides life insurance of Rs 1crore 8 lakh
राजपाल बिराजदार (विमा प्रतिनिधी)

विमा प्रतिनिधी श्री. राजपाल बिराजदार यांच्याशी त्यांनी संपर्क केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले. कुठेतरी आनंदमय झालेला जीवनात प्रकाश दिसला. बिराजदार यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे एल आय सी ने संबंधित पॉलिसी धारकाच्या कुटुंबीयांना एक करोड आठ लाखाचा जीवन विमा मृत्यू दावा मंजूर करून दिला. या प्रकरणानंतर जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, या शब्दाला एलआयसी खरी ठरली असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

हे सुद्धा वाचा

केंद्र सरकारची अनुसूचित जातींसाठी शिष्यवृत्ती योजना

मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळवून देण्यासाठी मंत्री सुभाष देसाईंची राष्ट्रपतींकडे मागणी

LIC could make IDBI Bank agent for LIC Housing

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी