29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeशिक्षणअनुसूचित जातींच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

अनुसूचित जातींच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

टीम लय भारी

मुंबई : राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता राबवण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना तसेच राज्य पुरस्कृत शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती (फ्रीशिप) या योजनांचे महाडीबीटी पोर्टल द्वारे ऑनलाइन फॉर्म भरण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे(Central Government Scholarship Scheme for Scheduled Castes).

फ्रिशिप च्या तारखेत मुदत वाढ करता याची अंतिम तारीख दि. २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत करण्यात आलेली आहे. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेकरिता केंद्रशासनाने याअगोदरच अंतिम मुदत दिली होती मात्र राज्य शासनाच्या विशेष प्रयत्नांमुळे सदर योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याकरीता मुदतवाढ आता 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत देण्यात आलेली आहे.

याअगोदर सहा वेळेस अर्ज भरण्यास मुदतवाढ शासनाकडून देण्यात आली होती तेव्हा सदर योजनेकरिता अर्ज करावयाची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२२ अंतिम असून राज्यातील विद्यार्थी, पालक तसेच संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी तात्काळ नवीन तसेच नूतनीकरणाचे अर्ज महाडीबीटी पोर्टल द्वारे विहित वेळेत नोंदणीकृत करून घ्यावेत असे जाहीर आव्हान मा. मंत्री महोदय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी डीबीटी वर अर्ज करण्याकरिता मुदतवाढ

महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेणाऱ्यांना अर्जाचे नूतनीकरण करण्यासाठी मुदतवाढ : धनंजय मुंडे

धनंजय मुंडेंचा महत्वपूर्ण निर्णय, 1 मार्चपासून दिव्यांगांच्या विशेष शाळा/कार्यशाळा सुरू होणार

Rs 1,827 Crore For National Means-Cum-Merit Scholarship For Next 5 Years

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी