38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeटॉप न्यूजमराठी भाषेला 'अभिजात' दर्जा मिळवून देण्यासाठी मंत्री सुभाष देसाईंची राष्ट्रपतींकडे मागणी

मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळवून देण्यासाठी मंत्री सुभाष देसाईंची राष्ट्रपतींकडे मागणी

टीम लय भारी

मुंबई : सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली एक जनअभियान सुरु करण्यात आलेले आहे. मराठी भाषेला “अभिजात” दर्जा मिळावा यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवर एकटवले आहेत. या जनअभियानात सहभागी झालेले आहेत. मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी असलेली ४ हजार पोस्ट कार्ड काल (२० फेब्रुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींकडे रवाना करण्यात आली. याप्रसंगी वर्षा शासकीय निवासस्थानी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते(Minister Subhash Desai’s demand to the President to give ‘elite’ status to Marathi).

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनअभियान हाती घेण्यात आले आहे. पोस्टकार्डांचा हा दुसरा संच असून, या पूर्वी देखील एक संच राष्ट्रपतींना पाठवण्यात आला असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. तर ट्विट करत देसाई यांनी ही माहिती दिली आहे. अनेक वर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न आता शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपलेला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वात जन अभियान सुरू करण्यात आले आहे.

राज्य येत्या २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा करत असताना त्या आधीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यस. या दिनाला आगळे महत्व प्राप्त होणार आहे आणि तसे व्हावे यासाठी राज्य सरकारने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

हे सुद्धा वाचा

औरंगाबाद जिल्ह्यात 500 कोटीचा निधी मंजूर, सुभाष देसाई यांनी दिली माहिती

औरंगाबादमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना वेग

भाषा विभागाचा तीन वर्षांचा कृती आराखडा तयार करा, सुभाष देसाई यांचे आदेश

Maharashtra minister meets Kishen Reddy, seeks classical language status for Marathi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी