32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूजLunar Eclipse 2021: चंद्रग्रहणादरम्यान आज काय करावे आणि करू नये ?

Lunar Eclipse 2021: चंद्रग्रहणादरम्यान आज काय करावे आणि करू नये ?

टीम लय भारी

नवी दिल्ली: Lunar Eclipse or Chandra Grahan November 2021: १९ नोव्हेंबरला चंद्रग्रहण होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहणाचा काळ हा पृथ्वीवरील सर्व जीवांवर नकारात्मक प्रभावाचा काळ मानला जातो. त्यामुळे या काळात वाईट परिणाम टाळण्यासाठी अनेक उपाय सुचवले जातात(Lunar Eclipse : what to do and what not to do)

या काळात अनेक शुभ कार्ये करण्यास मनाई आहे. सुतक कालावधी चंद्रग्रहणाच्या ९ तास आधी सुरू होतो. ग्रहणाच्या काळापासून ते ग्रहण संपेपर्यंत अनेक कामे करण्यास मनाई आहे. जाणून घ्या ग्रहण काळात काय करावे आणि काय करू नये.

Numbness Home Remedies : हात पाय सतत सुन्न पडतायत? मग, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा आराम

थंडीत कोरड्या केसांनी हैराण ? मग करा हे उपाय

सुतक आणि ग्रहण काळात काय करू नये

  • या काळात कोणतेही शुभ कार्य करू नका किंवा कोणतेही नवीन कार्य सुरू करू नका.
  • ग्रहण काळात पूजेची कामेही केली जात नाहीत आणि देवाच्या मूर्तींनाही हात लावला जात नाही. या दरम्यान मंदिर झाकून ठेवावे.

Health Minister Rajesh Tope : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे ट्विट; रेमडेसिविरचे 10 हजार इंजेक्शन खरेदी करणार

Lunar Eclipse 2021 LIVE Updates: Chandra Grahan Will be Visible in India; Check Images from India, Around The World

  • ग्रहण काळात तुळशीच्या रोपाला हात लावू नये. सुतक लावण्यापूर्वी तुळशीची पाने खुडून घ्या.
  • ग्रहण काळात अन्न खाल्ले जात नाही. यासोबतच तुळशीची काही पाने खाण्याच्या पदार्थात ठेवावीत.
  • सुतक कालावधीचे नियम गर्भवती महिला, वृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना लागू होत नाहीत.
  • ग्रहण काळात गरोदर महिलांनी कापणी, सोलणे किंवा शिवणकाम करू नये. असे मानले जाते की त्याचा गर्भात असलेल्या मुलावर वाईट परिणाम होतो.
  • ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये.
  • ग्रहणाचे वाईट परिणाम टाळण्यासाठी देवतेची मनोभावे पूजा करावी. यासोबतच चंद्र मंत्राचा जप फलदायी मानला जातो.
  • ग्रहण काळात झोपू नये.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी