31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील 7 हजार ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकांसाठी तारखा जाहीर, वाचा संपूर्ण कार्यक्रम

राज्यातील 7 हजार ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकांसाठी तारखा जाहीर, वाचा संपूर्ण कार्यक्रम

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक आयोगाने एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7 हजार 130 ग्रामपंचायत सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे अध्यक्ष यू. पी. एस. मदान यांनी अधिकृतपणे याबाबतची माहिती जारी केली आहे (Maharashtra Election Commission’s big announcement).

“राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7 हजार 130 सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे”, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे. निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं.

SIDBI आणि Google चा करार, लघू उद्योगांना 25 लाख ते 1 कोटींपर्यंत कर्ज मिळणार

Numbness Home Remedies : हात पाय सतत सुन्न पडतायत? मग, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा आराम

Maharashtra Election Commission's big announcement
पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार

पोटनिवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त मदान यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. त्यांची छाननी 7 डिसेंबर 2021 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 पर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील.

LIC Recruitment 2021: एलआयसीमध्ये विमा सल्लागार पदाच्या 100 जागांवर भरती, पाहा शेवटची तारीख किती?

Election Commission of India rejects govt’s proposal to transfer Ludhiana DC

त्यानंतर मतदान हे 21 डिसेंबर 2021 रोजी होईल. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी असेल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3.00 पर्यंतच असेल. या सर्व ठिकणी 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी