33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeटॉप न्यूजपहिल्या वनडेत भारताचा 7 गडी राखत श्रीलंकेवर दणदणीत विजय...

पहिल्या वनडेत भारताचा 7 गडी राखत श्रीलंकेवर दणदणीत विजय…

टीम लय भारी

मुंबई :- श्रीलंकेच्या कोलंबो येथे भारत विरूद्ध श्रीलंका असा पहिला वनडे सामना काल आर. प्रेमदासा या मैदानावर झाला. या पहिल्या वनडेत भारताने ७ गडी राखत श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताने हा विजय मिळवला (In this first ODI, India defeated Sri Lanka by a landslide).

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार दासून शनाका व चमिका करुणारत्ने या दोघांच्या बळावर श्रीलंकेने ५० षटकात २६२ धावा केल्या.

आयसीसीने केली टी- 20 विश्वचषक 2021 ची घोषणा

मी उत्तर द्यायला तयार आहे, उत्तरे देण्याची सरकारला संधीही द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदी

तर भारताने श्रीलंकेला सडेतोड उत्तर देत २६२ धावांचे लक्ष्य सहजरीत्या पेलले. या सामन्यात युवा फलंदाज पृथ्वी शॉने ४३ धावा केल्या तर ईशान किशनने ५९ धावा केल्या. अशा प्रकारे भारताने श्रीलंकेवर तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली (India took a 1-0 lead over Sri Lanka in the three-match series).

ODI India defeated Sri Lanka by a landslide
पहिली वनडे

भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणे शक्य नाही; नवाब मलिक

India vs Sri Lanka Match Highlights And Updates 1st ODI From Colombo: Dhawan, Ishan Shine as Clinical India Beat Sri Lanka by 7 Wickets

भारत –

भारताच्या सलामीवीर जोडीने म्हणजेच कर्णधार शिखर आणि पृथ्वी शॉने पहिल्या पाच षटकात बिनबाद ५७ धावांची भागीदारी केली. पृथ्वीने २४ चेंडूत ४३ धावा केल्या. नंतर धनंजय डि. सिल्वाने विकेट घेत पृथ्वीला मैदानाच्या बाहेर केले. तसेच ईशानने ३३ चेंडुत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ८ चौकार आणि २ षटकाराच्या जोरावर ५९ धावा केल्या. तर मनिष पांडेने २६ धावा केल्या, तसेच सूर्यकुमार यादवने नाबाद ३१ धावा केल्या. कर्णधार धवनने ८६ धावांची खेळी करत गोलंदाज संदाकनच्या चेंडूवर एक धाव घेत भारताला विजय मिळवून दिला.

श्रीलंका –

श्रीलंकेकडून मिनोद भानुका आणि अविष्का फर्नांडो यांनी खेळाला सुरुवात केली. भुवनेश्वर कुमारने गोलंदाजीची सलामी दिली. तसेच यजुवेंद्र चहलने आपल्या पहिल्या षटकात स्थिरावलेल्या अविष्काला ३२ धवांमध्ये बाद केले. त्यानंतर सुरवातीचे तीन गडी बाद झाल्यावर कर्णधार शनाका आणि चरिथा असलांकाने श्रीलंकेला स्थिरता आणली. असलांकाने ३८ धावा तर शनाकाने ३९ धावा केल्या. शेवटच्या षटकात १९ धावा करत चमिका करूणारत्नाने २६२ धावांचे लक्ष्य भारता समोर उभे केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी