33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजवरिष्ठ पत्रकार गोविंद तुपे यांचा कमाल खान पुरस्काराने सन्मान

वरिष्ठ पत्रकार गोविंद तुपे यांचा कमाल खान पुरस्काराने सन्मान

टीम लय भारी
मुंबई:- जनादेश वृत्तवाहिन दरवर्षी  आपल्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील नामवंत पत्रकाराला विशेष पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करते. यंदाच्या वर्षी या पुरस्काराचे नामकरण करून कमाल खान विशेष पत्रकारिता पुरस्कार असे करण्यात आले आहे.( Senior journalist Govind Tupe Kamal Khan Award)

पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि समाजातील तळागाळातील कष्टकरी सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांवर सातत्याने आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडणाऱ्या पत्रकारांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते आहे.

हे सुद्धा वाचा

ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी झोमॅटोविरोधात पोलिसांकडे केली तक्रार दाखल

ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचं निधन

एनडीटीव्हीचे ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Senior journalist E Somanath passes away

या वर्षीचा कमाल खान विशेष पत्रकारिता पुरस्कार झी 24 तास चॅनलचे सीनियर स्पेशल करस्पाँडंट गोविंद तुपे यांना देण्यात आला आहे. शाल श्रीफळ सन्मानचिन्ह आणि रोख 11 हजार 111 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

नुकतच लखनऊमध्ये वरिष्ठ पत्रकार कमाल खान यांचे निधन झाले आहे. कमाल खान आपल्या रिपोर्टिंगच्या शैलीसाठी प्रसिद्ध होते. ते एनडीटीव्हीचे लखनौ (उत्तरप्रदेश) प्रतिनिधी होते.  त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार त्यांच्या नावाने सुरू करण्यात आला आहे. यावेळी या कार्यक्रमासाठी राजकीय सामाजिक तसेच पत्रकारिता क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष, वरिष्ठ पत्रकार समीर चवरकर होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी