29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeशिक्षणदहावी बारावी विद्यार्थ्यांबाबत बच्चू कडूंची मोठी घोषणा

दहावी बारावी विद्यार्थ्यांबाबत बच्चू कडूंची मोठी घोषणा

टीम लय भारी
मुंबई :- कोरोनाचे सावट असल्याने 2 वर्ष शाळा, कॉलेज काम व्यापार रेल्वे सर्व व्यवस्था बंद होत्या. सर्वांचेच नुकसान झाले आहे. परंतु देशातील युवा पिढीला याचा सर्वात जास्त फटका बसला आहे. दहावी आणि बारावी हे मुख्य पाया असलेले शिक्षण घेण्याकरता विद्यार्थ्यांना कसून मेहनत करावी लागते परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शाळा बंद केल्याने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचे नुकसान झाले.(Bachchu Kadu about 10th and 12th class students Big announcement)

ऑफलाइन पद्धतीने शाळांमध्ये विद्यार्थ्यांना लिखाणाचा सराव चालू असतो परंतु आता ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना लिखाणाचे प्रमाण फारच कमी झाले आहे. आळस पणा हा विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. मागील दोन वर्षांच्या काळात शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास आणि लिखाणाचा सराव झालेला नसल्याने, येत्या मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात ढकलण्याची शक्यता वर्तवण्याचे येत आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यपालांचा आडमुठेपणा, १२ आमदारांची माहिती अधिकारात कागदपत्रे देण्यास टाळाटाळ

आदित्य ठाकरे यांनी जगविख्यात अजिंठा लेण्यांना दिली भेट, पर्यटनवाढीसाठी महत्वाचे पाऊल

ज्योती बसू प्रधानमंत्रीपद आणि बुद्धदेव भट्टाचार्य पद्म पुरस्कार का नाकारतात?

Defection politics heats up in Karnataka

शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षण उपसंचालकांसोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत केल्या आहे. ही ऑनलाईन बैठक शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थित पार पडली आहे.तसेच राज्यात सध्या शाळांबाबत ऑनलाइन-ऑफलाईनचा जो काही घोळ सुरू आहे त्यामुळे देखील विद्यार्थी संभ्रमात आहेत. पालकांमध्ये देखील गोंधळाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे.

तसेच मागील दोन वर्षांच्या काळात शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास आणि लिखाणाचा सराव झालेला नसल्याने ही मागणी केली जात होती. मुलांचा लिखाणाचा सराव सुटल्याने त्यांना परीक्षेत अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्या अशी सूचना राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षण उपसंचालकांसोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत केली.
त्यामुळे मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार असल्याचे शक्यता वर्तवण्याचे येत आहे. ऑनलाईन बैठकीला शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी