34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजराज्यातील शॉपिंग मॉल्स रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार

राज्यातील शॉपिंग मॉल्स रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार

टीम लय भारी

मुंबई : राज्यात हळुहळू कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. याच पाश्र्वभूमीवर राज्यातील सर्व शॉपिंग मॉल्स रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु असे असले तरी शॉपिंग मॉल्सच्या मालकांना काही नियम पाळावे लागणार आहेत (shopping malls in the state are allowed to continue till 10 pm).

शॉपिंग मॉल्समध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचार्यांनी आणि प्रवेश करणाऱ्या नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत. तसेच लसीचा दुसरा डोस घेतल्यावर १४ दिवस पूर्ण झाले असतील तरच प्रवेश द्यावा.यासाठी शॉपिंग मॉल्सच्या प्रवेश द्वारावर लसीकरण प्रमाणपत्र व फोटोसहित ओळखपत्र दाखविणे बंधनकारक असणार आहे.

अफगाणिस्तानचे दोन्ही खेळाडू खेळणार आयपीएल

पंकजाताईंनी आपल्याच कार्यकर्त्यांना झापले, ‘मुर्खांनो’ असा केला उल्लेख

shopping malls in the state are allowed to continue till 10 pm
लसीचे दोन डोस घेतलेल्यांना मिळणार मॉल्समध्ये प्रवेश करण्याची परवानगी

अद्याप १८ वर्षाखालील मुलांच्या लसीकरणास परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे मॉल्समध्ये १८ वर्षाखालील मुला- मुलींना प्रवेश करण्यासाठी वयाचा पुरावा दाखवावा लागणार आहे. यासाठी पुरावा म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा किंवा महाविद्यालयाचे वैद्य ओळख पत्र प्रवेशद्वारावर दाखविणे बंधनकारक असणार आहे.

क्रिकेटपट्टू अंजिक्य रहाणेच्या गावात रस्त्याचे काम सुरू, बाळासाहेब थोरात यांचा पुढाकार

Maharashtra govt extends timings of hotels, restaurants, shopping malls – See new guidelines

या आधी मुख्यमंत्र्यांनी लसीचे दोन डोस घेतल्यावर दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्यांना उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी दिली होती. स्वातंत्र्य दिनापासून लसीचे दोन डोस घेतलेल्यांना उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी