31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजठाणे जिल्ह्यात रिक्षाचालकांचा बेमुदत संपाचा इशारा

ठाणे जिल्ह्यात रिक्षाचालकांचा बेमुदत संपाचा इशारा

टीम लय भारी

कल्याण आरटीओने काही दिवसांपूर्वीच शेअर रिक्षांसाठी असलेल्या भाडे दरात मोठी कपात केली होती.यावरून रिक्षा चालक संघटनांनी नाराजी व्यक्त केली(Thane: Rickshaw drivers warned of indefinite strike in the district)

या नव्या दरपत्रकात अंबरनाथ आणि बदलापुर शहरांसह डोंबिवली, कल्याण आणि उल्हासनगर शहरातील भाडे दर सुद्धा कमी करण्यात आले होते. या भाडे कपातीचं प्रवाशांनी स्वागत केलं असलं, तरीही रिक्षा संघटनांनी मात्र, या भाडे कपातीचा विरोध केला आहे.

महाराष्ट्र सरकारने प्रति लिटर वाईनच्या बाटलीवर 10 रुपये नाममात्र अबकारी कर जाहीर केला आहे.

दिल्लीत उदयनराजे भोसलेंनी घेतली शरद पवारांची भेट; तर्क-वितर्कांना उधाण!

अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील अधिकृत रिक्षा प्रवासी भाडे घोषित करण्यात आले आहे. यात किमान भाडे ९ रुपये ठरवून देण्यात आले आहे, अशी माहिती कल्याण आरटीओचे अधिकारी तानाजी चव्हाण यांनी सांगितले.

अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये बेकायदा पद्धतीने प्रवासी रिक्षा भाडेवाढ करणाऱ्या रिक्षाचालकांना उपप्रादेशिक परिवहन विभागाने (Kalyan RTO) दणका दिला आहे.

iPhone 14 Pro मध्ये 48MP कॅमेरा आणि 8GB RAM मिळणार, कसा असेल नवीन स्मार्टफोन

Thane: Rickshaw driver killed in Kalyan; search on for accused

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांतील अधिकृत रिक्षा प्रवासी भाडे घोषित केले असून, दीड किलोमीटरपर्यंत 9 रुपये, तर चार किलोमीटरपर्यंत कमाल भाडे 24 रुपये इतके जाहीर करण्यात आले आहे, असे कल्याण आरटीओचे अधिकारी तानाजी चव्हाण यांनी सांगितले. बदलापूर व अंबरनाथ शहरात सध्या किमान भाडे 10 ते 15 रुपये आकारले जाते. तर कमाल भाडे 30 ते 35 रुपयांपर्यंत आकारले जाते. त्यामुळे आता प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

कल्याण RTO ने ज्या सर्वेक्षणानुसार ही दर निश्चिती केली, ते सर्वेक्षण 2015 साली झालेलं असून त्यावेळी असलेले गॅसचे दर आणि महागाई ही आज 6 वर्षांनी जवळपास दुप्पट झालेली आहे.

त्यामुळे कल्याण आरटीओने जारी केलेले हे नवे दर हे आम्हाला परवडण्यासारखे नसल्याची भूमिका अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील रिक्षा संघटनांनी घेतली आहे. हे दर निश्चित करताना आम्हाला विश्वासात घेतले नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी