35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजराज्यस्तरीय माणूसकी सेवा गौरव पुरस्कार देवेंद्र भुजबळ यांना जाहीर

राज्यस्तरीय माणूसकी सेवा गौरव पुरस्कार देवेंद्र भुजबळ यांना जाहीर

टीम लय भारी

मुंबई : भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल फौंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या “राज्यस्तरीय माणूसकी सेवा गौरव पुरस्कार” देवेंद्र भुजबळ यांना जाहीर झाला आहे. नाशिक येथे २६ फेब्रुवारी रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. देवेंद्र भुजबळ हे सध्या www.marathi.newsstorytoday.com या आंतरराष्ट्री वेबपोर्टलचे संपादक आहेत(State level Humanitarian Service Pride Award announced to Devendra Bhujbal).

भुजबळ हे पत्रकार असुन भारत सरकारच्या मुंबई दूरदर्शनमध्ये निर्माता, महाराष्ट्र शासनाच्या माहिती खात्यात अधिकारी होते. माहिती संचालक म्हणून ते २०१८ साली निवृत्त झाले. दूरदर्शनच्या गाजलेल्या “महाचर्चा” कार्यक्रमाच्या २०० भागांसाठी ते ४ वर्षे रिसर्च अँड रिसोर्स पर्सन तर आकाशवाणी वरील महाराष्ट्र शासनाच्या “दिलखुलास” कार्यक्रमाच्या पहिल्या ५०० भागांचे टीमलीडर होते(Devendra Bhujbal is a journalist and producer in the Government of India’s Mumbai Doordarshan, an officer in the Information Department of the Government of Maharashtra).

ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या चौथ्या विश्व सावरकर साहित्य संमेलनात त्यांचे “स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाजवल्य पत्रकारिता” या विषयावर झालेले व्याख्यान विशेष गाजले. “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता ” हा त्यांचा संशोधन पर लेख मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, ऊर्दू भाषेतही प्रसिद्ध झाला आहे . विविध विषयांवर ते सातत्याने लिहीत असत.

हे सुद्धा वाचा

मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळवून देण्यासाठी मंत्री सुभाष देसाईंची राष्ट्रपतींकडे मागणी

बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांतून ९ गावांचा पाणीप्रश्न सुटणार

Polytrade bags the “Best Financial Institution of the Year” award presented by the Governor of Maharashtra at Raj Bhavan

महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज वेबपोर्टलसाठी “करिअर नामा” हे सदर त्यांनी सुरू केले . या सदरासाठी ते स्वतः नियमित लेखन करीत. हे लेख विविध वृत्तपत्रातूनही प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी लिहिलेले भावलेली व्यक्तिमत्वे,स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाजवल्य पत्रकारिता ,अभिमानाची लेणी हे ई -पुस्तक प्रसिद्ध झाले.गगनभरारी प्रेरणेचे प्रवासी कासार समाजातील ३५ व्यक्तींच्या यशकथा असलेले “समाजभूषण”करिअरच्या नव्या दिशा ही त्यांची पुस्तके लोकप्रिय ठरली. कोरोनाच्या काळात लोकांचे मनोधैर्य कायम राहण्यासाठी विविध माध्यमातून ते मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत होते. भुजबळ यांना आतापर्यंत विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे(Devendra Bhujbal started “Career Nama” for Maharashtra Government’s Mahanews web portal).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी