31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयआम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू, भाजपामधून बाहेर पडा, संभाजी ब्रिगेडचे प्रत्युत्तर

आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू, भाजपामधून बाहेर पडा, संभाजी ब्रिगेडचे प्रत्युत्तर

टीम लय भारी

मुंबई :- संभाजीराजे छत्रपती सध्या बीडच्या दौऱ्यावर आहेत. बीडमध्ये शुक्रवारी संभाजीराजेंचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यांवर प्रश्न विचारले, त्यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मला मुख्यमंत्री करा मग प्रश्न विचारा. संभाजीराजे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू, तुम्ही आधी भाजपामधून बाहेर तर पडा, असे आज संभाजी ब्रिगेड म्हणाले आहेत (We will make you the Chief Minister get out of the BJP of the Sambhaji Brigade).

संभाजीराजेंना २००८-०९ सोबत घेऊन आम्ही यात्रा काढली होती. आम्ही त्यांना आपलं समजतो. संभाजीराजेंना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर मला त्यांना सांगायचंय, की तुम्ही पहिल्यांदा भाजपमधून बाहेर पडा आणि संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेश करा, आम्ही त्यांचे आनंदाने स्वागत करु. त्यांनी आमच्या पक्षात यावं नेतृत्व करावं, आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवू, असे प्रत्युत्तर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी दिले आहे (We will make him the Chief Minister replied Sambhaji Brigade spokesperson Dr. Presented by Shivanand Bhanuse).

प्रश्न विचारायचा असेल तर आधी मुख्यमंत्री करा, संभाजीराजे भडकले…

दारे खिडक्या असता बंद, पाठविले ऐसे गतीमंद; मिटकरींनी काढला पडळकरांना चिमटा

तसेच छत्रपती संभाजीराजे, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तर महाराष्ट्रातील राजकीय गणिते बदलतील असा विश्वास संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी व्यक्त केला (This is the belief of Sambhaji Brigade spokesperson Dr. Expressed by Shivanand Bhanuse).

make you the Chief Minister get BJP of the Sambhaji Brigade
संभाजी राजे

‘ही कारवाईची सुरूवात आहे, यादी मोठी आहे आणि सर्व रडारवर आहेत’ : चंद्रकांत पाटील

Sambhajiraje Chhatrapati announces date, place for Maratha quota protest

बीड दौऱ्यावर असतांना संभाजीराजे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी संभाजीराजेंना प्रश्न विचारला. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा अशी मागणी आपण का करत नाही? त्यावर संभाजीराजे म्हणाले, प्रश्न विचारायचे असतील तर मला मुख्यमंत्री करा. मात्र, त्यांच्या या वक्तव्यानंतर संभाजीराजेंना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे (There is talk in political circles that Sambhaji Raje wants to be the Chief Minister).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी