29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीययेत्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन, जिल्हा जनविकास आघाडी एकत्र

येत्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन, जिल्हा जनविकास आघाडी एकत्र

टीम लय भारी

मुंबई :- जिल्हा परिषद पोटनिवडणुक लवकरच होणार आहेत. यासाठी सर्व पक्षांनी आपली कंबर कसली आहे. येत्या जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी आता वंचित बहुजन आघाडी आणि जिल्हा जनविकास आघाडीने युती केली आहे विशेष म्हणजे या दोन्ही पक्षांनी सर्वच जागांवर युती केली आहे (Disadvantaged Bahujan in the coming elections District Jan Vikas Aghadi together).

वंचित बहुजन आणि जिल्हा जनविकास आघाडी यांनी सर्वच जागांवर युती केली आहे. याबाबत वाशिम पत्रकार परिषदेत या दोन्ही पक्षांनी घोषणा केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर व जनविकास आघाडीचे अनंतराव देशमुख एकत्र आल्याने, इतर पक्षांना निवडणूक जड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे (Other parties are being told that the election will be difficult).

बारावी निकालाची मूल्यमापन पद्धत जाहीर…

आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू, भाजपामधून बाहेर पडा, संभाजी ब्रिगेडचे प्रत्युत्तर

जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच जागेवर  वंचित बहुजन आघाडी व जिल्हा जनविकास आघाडी एकत्र लढणार आहे. अशी घोषणा वाशिम येथील विदाता येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केली. ही घोषणा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवान फुंडकर, जिल्हा जनविकास आघाडीचे नेते ॲड. नकुलदादा देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. या पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षाचे नेतेमंडळी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष गजाननराव लाटे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र देशमुख, जिल्हा परिषदेचे जन विकासचे गटनेते स्वप्नील सरनाईक, वंचित आघाडीचे महासचिव सिद्धार्थ देवरे, प्रदेश सदस्य किरणताई गिर्हे, जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव शिंदे, रिसोड पंचायत समिती सभापती सुभाषराव खरात यांच्यासह वंचित बहुजन आघाडी व जिल्हा जनविकास आघाडीचे पदाधिकारी, यावेळी ही सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची यावेळी मोठी उपस्थित होती (Officials and activists of both the parties were present in large numbers).

भारत-मालदीव संबंध धोक्यात?

Om Prakash Rajbhar Attacks BJP Over Uttarakhand CM; Offers Solution To Make Owaisi UP CM

येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या होणाऱ्या पोटनिवडणुकरिता भरजहॉंगीर, पांगरी, मोप, महागाव, जऊळका, जोडगव्हाण, शिरपूर, मारसुळ या जागांवर वंचित बहुजन विकास आघाडी लढणार आहे. तर गोभणी, कवठा, हराळ, खंडाळा येथील जागांवर जनविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक लढणार आहेत अशी घोषणा या पत्रकार परिषदेत करण्यात आली. तर वाकद येथे मैत्रीपूर्ण लढत होणार, असल्याचे सांगण्यात आले आहे (It has been said that there will be a friendly match at Wakad).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी