31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeआरोग्यकेरळनंतर आता महाराष्ट्रात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला

केरळनंतर आता महाराष्ट्रात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला

टीम लय भारी

केरळनंतर आता महाराष्ट्रात झिका विषाणूने शिरकाव केला आहे. पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तहसील येथे राहणाऱ्या ५० वर्षीय महिलेला झिकाची लागण झाली आहे. सध्या महिलेची प्रकृती ठीक असून तिच्यावर उपचार सुरू आहे. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. (Zika virus found in maharashtra)

पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात झिका विषाणूचा रुग्ण सापडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. बेलसर , जेजुरी या परिसरात गेले दीड महिन्यापासून डेंग्यू , चिकनगूनिया , मलेरिया यासारख्या आजारांनी थैमान घातले आहे. त्यामुळे बेलसर येथील ५१ रुग्णांचे नमुने जमा करून ते तपासणीसाठी एनआयव्ही पुणे येथे पाठवण्यात आले होते. तपासणीनंतर झिका विषाणूचा १ रुग्ण तर २५ चिकनगुनिया व ३ डेंग्यूचे रुग्ण आढळले.

भाजप नेते बाबूल सुप्रीयो यांचा राजकारणाला रामराम

Zika
महाराष्ट्रात झिका विषाणूचा पहिला रुग्ण

समुद्रकिनाऱ्यावर महिलेचा मृतदेह

या पाश्र्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषप्रसाद यांनी बेलसर गावाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. त्याचबरोबर त्वरित उपायोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले.

* झिका विषाणूची लागण कशी होते ? :-
एडीस जातीचा डास चावल्यामुळे झिका विषाणूची लागण होते. तसेच या डासामुळे डेंग्यू , चिकनगुनिया आणि पिवळा ताप होण्याची शक्यता असते. या विषाणूचा सर्वाधिक धोका हा गर्भवती महिलांना असतो. गर्भातील बाळाला ही या विषाणूची लागण होऊ शकते.

* झिका विषाणूची लक्षणे काय असतात ? :-
ताप येणे , अंग दुखणे , अंगावर लाल चट्टे येणे ही या विषाणूची सर्वसाधारण लक्षणे आहेत. तसेच ही लक्षणे दोन ते सात दिवसांपर्यंत राहतात.

प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर सदा सरवणकर यांचं प्रतिउत्तर

Maharashtra’s First Ever Zika Virus Case Reported In Pune District

* झिका विषाणूचा इतिहास :-
१९४७ मध्ये युगांडामध्ये पहिल्यांदा वानरामध्ये हा विषाणू ओळखला गेला होता. त्यांनतर १९५२ मध्ये युगांडा आणि युनायडेड रिपब्लिक ऑफ टांझनिया येथे माणसामध्ये झिका विषाणू आढळला गेला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी