28 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमंत्रालयराज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना ‘कोरोना’ची लागण

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना ‘कोरोना’ची लागण

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’ने मंत्रालयात हातपाय पसरले आहेत. आता राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनाही ‘कोरोना’ची लागण झाली आहे ( IAS Sanjay Kumar tested Corona positive ).

संजय कुमार यांच्यासह त्यांच्या एका वरिष्ठ स्वीय सहायकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. परंतु संजय कुमार यांचे वाहन चालक, सुरक्षा रक्षक व घरातील सर्व सदस्य यांना ‘कोरोना’ची लागण झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

शुक्रवारी मंत्रालयात ‘कोरोना’ चाचणी शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी मुख्य सचिव कार्यालयातील सर्वजणांची ॲण्टीजन तपासणी करण्यात आली. त्यात संजय कुमार व त्यांच्या एका वरिष्ठ स्वीय सहायकाला लागण झाल्याचे आढळून आले.

हे सुद्धा वाचा

अनिल देशमुखांनी भाजपला डिवचले, सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी सीबीआयच्या तपासावर केला सवाल

Online Class : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या सर्वेक्षणात गुंतलेले शिक्षक ऑनलाइन वर्गाचा अहवाल कधी व कसा देणार?

OBC Reservation : मराठा समाजाला दिलेले आरक्षण चुकीचे, आरक्षणाला आमचा विरोध नाही पण…

त्यानंतर पुन्हा दुसरी चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला. त्यात त्यांना ‘कोरोना’ झाल्याचे निष्पन्न झाले. संजयकुमार मंत्रालयासमोरील यशोधन इमारतीत राहतात. सध्या तिथेच ते होम कॉरन्टाईन झाले आहेत. त्यांची तब्येतही उत्तम आहे. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

‘कोरोना’मुळे संजयकुमार यांना आता १० – १२ दिवस तरी ‘कॉरन्टाईन’ राहावे लागेल. त्यामुळे अन्य वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांकडे त्यांना मुख्य सचिव पदाचा पदभार द्यावा लागेल. ज्येष्ठतेनुसार सीताराम कुंटे यांना ही जबाबदारी दिली जाऊ शकते असेही या सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

Mahavikas Aghadi

lay bhari
येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी