28 C
Mumbai
Friday, July 26, 2024
Homeशिक्षणविद्यापीठाच्या ग्रीष्मकालीन आंतरवासियता योजनेस प्रारंभ

विद्यापीठाच्या ग्रीष्मकालीन आंतरवासियता योजनेस प्रारंभ

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील पदवीपूर्व अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या तृतीय शैक्षणिक वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांकरीता ग्रीष्मकालीन आंतरवासियता- 2024 योजनेस नुकताच प्रारंभ करण्यात आला आहे. ग्रीष्मकालीन आंतरवासिता योजनेसाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत मंगळवार, दि. 07 मे 2024 पर्यंत आहे. विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आंतरवासियता पूर्ण करता यावे यासाठी विद्यापीठाने मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प. यांच्या संकल्पनेतून ग्रीष्मकालीन आंतरवासियता योजनेस (Summer Internship Program) प्रारंभ करण्यात आला आहे

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (University) संलग्नित महाविद्यालयातील पदवीपूर्व अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या तृतीय शैक्षणिक वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांकरीता ग्रीष्मकालीन आंतरवासियता- 2024 योजनेस (summer internment plan) नुकताच प्रारंभ करण्यात आला आहे. ग्रीष्मकालीन आंतरवासिता योजनेसाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत मंगळवार, दि. 07 मे 2024 पर्यंत आहे. विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आंतरवासियता पूर्ण करता यावे यासाठी विद्यापीठाने मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प. यांच्या संकल्पनेतून ग्रीष्मकालीन आंतरवासियता योजनेस (Summer Internship Program) (summer internment plan) प्रारंभ करण्यात आला आहे.(University’s summer internment plan begins)

आरोग्य क्षेत्रातील ज्ञानासोबतच अन्य शाखा, संबंधित तंत्रज्ञान, प्रक्रिया यांची माहितीही विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून हा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल. विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासाबरोबर संशोधन, वैज्ञानिक प्रयोग आणि इतर व्यावहारीक कौशल्ये विकसित होण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, प्रतिष्ठित संस्थेमध्ये वास्तविक जीवनाचा अनुभव व व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्यास विद्यार्थ्यांना मदत व्हावी हा उद्देश समोर ठेवून सदर योजना विद्यापीठाने सुरू केली आहे. राज्यातील विविध 73 केद्रांवर ग्रीष्मकालीन आंतरवासियता योजना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे पदवीपूर्व अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या तृतीय शैक्षणिक वर्षात असलेल्या इच्छुक विद्यार्थ्यांना ग्रीष्मकालीन आंतरवासियता प्रवेशासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्ज सादर करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना आपला अभ्यासक्रम सोडून नवीन गोष्टी शिकण्याची संधी या उपक्रमातून मिळणार आहे. या योजनेत निवड झाल्यानंतर विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून प्रति आठवडा रु. दोन हजार पाचशे इतके विद्यावेतन देण्यात येणार आहे. या योजनेचा कालावधी सुमारे दोन ते चार आठवडे इतका असणार आहे. विद्यापीठाने निर्देशित केलेल्या समर इंटरंशिप प्रोग्रम संटरवर ग्रीष्मकालीन आंतरवासियता पूर्ण करणाÚया विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून ऑनलाइन प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाच्या ग्रीष्मकालीन आंतरवासियता योजनेचे समन्वयक श्री. संदीप राठोड यांनी सांगितले की, ग्रीष्मकालीन आंतरवासियता योजनाचा कालावधी, शुल्क व अधिक माहिती विद्यापीठाचे www.muhs.ac.in
या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाने अधिसूचनेत दिलेल्या अटी व शर्तीस अधिन राहून दि. 07 मे 2024 पर्यंत विद्यापीठाकडे ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करणे गरजेचे असे त्यांनी सांगितले.

इच्छुकांनी अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संकुल विभागास ऑनलाईन [email protected] या ई-मेल पत्यावर किंवा दूरध्वनी क्र. 0553 – 2539156 या क्रमांकावर संपर्क साधावा. विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील अधिष्ठाता, प्राचार्य व महाविद्यालय प्रमुखांनी विद्यापीठाच्या ग्रीष्मकालीन आंतरवासियता योजनाची माहिती महाविद्यालयाच्या दर्शनी भागात प्रसिध्द करावी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ग्रीष्मकालीन आंतरवासियता योजनेबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी असे विद्यापीठाकडून आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी