31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयअरेरे, आधी 'किस' नंतर 'नको ते', दलाई लामांनी 'हे' काय केले !

अरेरे, आधी ‘किस’ नंतर ‘नको ते’, दलाई लामांनी ‘हे’ काय केले !

सर्वोच्च बौद्ध धर्मगुरू आणि भगवान गौतम बुद्धाचे वारसदार मानल्या जाणाऱ्या तिबेटी अध्यात्मिक नेता दलाई लामा यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. दलाई लामा यांचा 'किसिंग' आणि पुढे 'नको ते कृत्य' करण्याचा हा व्हायरल व्हिडिओ आहे. 'घृणास्पद' आणि 'किळसवाणे' अशा प्रतिक्रिया उमटाव्या, असे नेमके काय कृत्य दलाई लामा यांनी केले ते आपण जाणून घेऊया.

अरेरे, आधी ‘किस’ नंतर ‘नको ते’, दलाई लामांनी ‘हे’ काय केले, अशी प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियात उमटत आहे. सर्वोच्च बौद्ध धर्मगुरू आणि भगवान गौतम बुद्धाचे वारसदार मानल्या जाणाऱ्या तिबेटी अध्यात्मिक नेता दलाई लामा यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. दलाई लामा यांचा ‘किसिंग’ आणि पुढे ‘नको ते कृत्य’ करण्याचा हा व्हायरल व्हिडिओ आहे. ‘घृणास्पद’ आणि ‘किळसवाणे’ अशा प्रतिक्रिया उमटाव्या, असे नेमके काय कृत्य दलाई लामा यांनी केले ते आपण जाणून घेऊया.

तसे पाहिले तर दलाई लामा यांनी अशी अनाकलनीय, अनपेक्षित कृती किंवा टिप्पणी करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. काही वर्षांपूर्वीच त्यांनी एखादी महिला उत्तराधिकारी बनवायची असेल तर ती सुंदर आणि ‘आकर्षक’ असावी, असे वक्तव्य केले होते. तेव्हाही त्यांना जनतेच्या तीव्र प्रतिक्रियांना सामोरे जावे लागले होते. अर्थात नंतर दलाई लामा यांनी त्या वक्तव्याबद्दल जाहीरपणे माफी मागून विषय संपवला होता. आता त्याच पद्धतीने आजच्या कृतीने नव्याने वादाला तोंड फुटले आहे.

सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसते, की दलाई लामा यांनी आधी एका अल्पवयीन मुलाच्या ओठांवर चुंबन घेतले, नंतर त्यांनी त्या मुलाला आपली ‘जीभ चोखण्यास’ सांगितले. त्यामुळे आता दलाई वादात सापडले आहेत. या व्हिडिओने जगभर खळबळ उडाली आहे. नेटिझन्सकडूनही या व्हिडिओवर चांगल्याच संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

 

दलाई लामा आधी त्या मुलाच्या ओठांचा किस घेतात. त्यावेळी रांगेतील इतर काही लोक दलाई लामा यांना वंदन करण्यासाठी झुकलेले असतात. मुलाने चुंबन घेतल्यानंतर काही सेकंदांनंतर, दलाई लामा हे त्यांच्या तोंडाकडे बोट दाखवत जीभ बाहेर काढताना दिसतात. “तू माझी जीभ चोखू शकतो का,” असे ते लहानग्या मुलाला विचारताना व्हिडिओमध्ये ऐकू येते.

काय आहे जीभ बाहेर काढून आदर व्यक्त करायची तिबेटी परंपरा?

एका सर्वोच्च आदरास पात्र अध्यात्मिक गुरूला हे असे वागणे शोभणारे नाही. अत्यंत ‘घृणास्पद’ आणि ‘भितीदायक’ अशा प्रतिक्रिया या व्हिडिओवर नेटिझन्सकडून व्यक्त होत आहेत. “दलाई लामांचे हे प्रदर्शन पाहून अत्यंत धक्का बसला. यापूर्वीही त्यांना लैंगिक टिप्पणीबद्दल माफी मागावी लागली होती; पण एका लहान मुलाला ‘आता माझी जीभ चोख’ असे सांगणे म्हणणे फारच घृणास्पद आहे,” अशी टिप्पणी एका संतप्त यूझरने ट्विटद्वारे केली आहे.

“हे मी काय पाहतोय? हे दलाई लामा आहेत का? पेडोफिलियासाठी त्यांना अटक करणे आवश्यक आहे. मला त्यांचा तिरस्कार वाटतो,” असे दुसऱ्या एका यूझरने म्हटले आहे. “दलाई लामा यांनी सार्वजनिक कार्यक्रमात केलेले हे वर्तन सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत निंदनीय आहे. त्याला लैंगिक गैरवर्तन आणि विनयभंगच म्हणायला हवे. त्यांच्यावर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे,” अशाही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

कोण आहेत दलाई लामा ?

विकिपीडियानुसार, दलाई लामा हे तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते असतात. ‘दलाई लामा’ याचा अर्थ ‘ज्ञानाचा महासागर’ असा होतो. जगभरातील बौद्ध यांना आपले धर्मगुरू मानतात. आतापर्यंत 13 दलाई लामा होऊन गेले असून सध्याचे चौदावे दलाई लामा हे तेन्झिन ग्यात्सो आहेत. चीनने तिबेटवर केलेल्या आक्रमणामुळे त्यांना सध्या भारतातील हिमाचल प्रदेश राज्यात धरमशाला येथे आश्रय घ्यावा लागला आहे.

हे सुद्धा वाचा :

खळबळजनक : चीनने भारताच्या सीमेवर वसवली ६२४ गावे !

बौद्धांनो स्वतःचे कठोर आत्मपरीक्षण करा

डॉ. बाबासाहेबांचे मूळ आडनाव आंबेडकर नव्हते; जाणून घ्या महामानवाच्या ‘या’ खास गोष्टी

तिबेटमध्ये दलाई लामांची परंपरा चौदाव्या शतकापासून सुरू झाली. ‘दलाई’ म्हणजे महासागर व ‘लामा’ म्हणजे ज्ञान, दलाई लामा या संयुक्त शब्दाचा अर्थ ज्ञानाचा महासागर असा आहे. हे लामा बुद्धिष्ट गुरू किंवा शिक्षक असतात. पहिले लामा जेनडून द्रूप हे ड्रेपुंग विहाराचे उच्च लामा झाले. ‘ड्रेपुंग’ हा तिबेटमधील सर्वात भव्य विहार आहे. पहिल्या लामांनंतर प्रत्येक नवा दलाई लामा हा पूर्वीच्या लामाचा अवतार मानला जाऊ लागला. सध्या दलाई लामा हे तिबेटीय लोकांचे सर्वोच्च धार्मिक नेते व शासन प्रमुख देखील आहेत. इ.स. 1391 ते इ.स. 1933 या कालखंडात तेरा दलाई लामा होऊन गेले. तिबेटीय परंपरेनुसार ज्येष्ठ धर्मगुरू व शासन मिळून नवीन दलाई लामा निवडीची जबाबदारी पार पाडतात.

Dalai Lama Kissing Boy, Dalai Lama Kiss, Dalai Lama Unwanted Act, Dalai Lama Child Kiss, What Dalai Lama Done

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी