34 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeशिक्षणMPSC परीक्षांच्या ऑनलाईन अर्जात त्रुटी आढळून आल्याने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल

MPSC परीक्षांच्या ऑनलाईन अर्जात त्रुटी आढळून आल्याने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल

टीम लय भारी
मुंबई:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ऑनलाईन प्रणाली असणारी वेबसाईट डाऊन झाल्याचं समोर आलं होतं. आयोगाची ऑनलाईन अर्ज असणारी वेबसाईट प्रणाली बंद झाल्यांनं विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्यास अडचणी येत होत्या  पुण्यातील विद्यार्थ्यांनी याप्रकरणी आवाज उठवला असून महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्याचा अखेरचा दिवस असल्यानं विद्यार्थी हवालदिल झाले होते. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे.( MPSC exams online application has been extended)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२ पुढे ढकलली आहे. परीक्षा २ जानेवारी २०२२ रोजी होणार होती. आयोगाकडून परीक्षेची नवीन तारीख योग्य वेळी जाहीर केली जाईल. पूर्वपरीक्षेचे प्रवेशपत्र २२ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आले. तथापि, नवीन परीक्षेची तारीख निश्चित झाल्यावर नवीन प्रवेशपत्रे जारी केली जातील.

हे सुद्धा वाचा

MPSC : जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदाची जाहिरात प्रसिद्ध, 27 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन

अखेर MPSC ची परीक्षा 4 सप्टेंबरला होणार; लोकसेवा आयोगाची घोषणा

MPSC ची पूर्व परीक्षा पुन्हा लांबणीवर

MPSC Group C Exam 2021 application ends today; apply for 900 posts at mpsconline.nic.in

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची वेबसाईट डाऊन असल्यानं आजचा अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिवस असल्यानं विद्यार्थ्यांनी आयोगाकडे अर्ज सादर करण्याची मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी केली होती. अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अर्ज सादर करण्यास 17 जानेवाओरीपर्यंत मुदतवाढ दिल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

परीक्षेच्या कॅलेंडरनुसार, मुख्य परीक्षा 7, 8 आणि 9 मे 2022 रोजी आयोजित केल्या जाणार आहेत. प्रिलिम परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार मुख्य परीक्षेला बसतील. मेनमध्ये पात्र घोषित केलेले उमेदवार नंतर वैयक्तिक मुलाखतीसाठी उपस्थित राहतील. परीक्षांचे तीनही टप्पे पार पडल्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जाईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी