27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादीला पाठिंब्यासाठी काँग्रेसच्या जाचकअटी

राष्ट्रवादीला पाठिंब्यासाठी काँग्रेसच्या जाचकअटी

लय भारी न्यूज नेटवर्क 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेससमोर सत्तेच्या वाटपावरून विविध अटी शर्थी ठेवल्या आहेत. दिल्लीत ते पत्र तयार होत असून, राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात येईल. त्यामुळे काँग्रेसच्या आडकाठीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून पेच कायम आहेत. भाजप सत्तास्थापन करण्यात असमर्थता दर्शवली. त्यानंतर शिवसेनेला राज्यपालांकडून निमंत्रण मिळालं. सोमवारी शिवसेना राज्यपालांना पाठिंबा देणा-या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं पाठिंब्याचं पत्र देऊ शकली नाही. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापन करण्याचं निमंत्रण दिलं. परंतु काँग्रेस आणि शिवसेनेसह राष्ट्रवादीला सत्तास्थापन करु शकत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या दिल्लीश्वरांनी सत्तेच्या वाटपासंबंधी मंत्रीपद महामंडळ आणि मनपातील पदांबाबतचं सर्व फॉर्म्यूला ठरवल्यानंतरच पाठिंबा अशा अटी घालणार आहेत. तो पत्र दिल्लीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना देतील त्यावर चर्चेनंतरच सर्व काही निर्णय घेतले जातील अशीही माहिती समोर आली आहे.

दिल्लीत काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक सुरु आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरु आहे. आज रात्री साडेआठ वाजेपर्यंत राज्यपालांकडे राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापना करण्याइतप जादुई आकड्यांचा पाठिंबा दाखवावा लागणार आहे. राज्यपालांना पाठिंब्याचे पत्र सूपुर्द करावे लागणार आहेत त्यामुळे पुढे काय होणार याकडे लक्ष लागले आहेत. मात्र काँग्रेस नेते काय करणार यावर बरचं काही अवलंबून आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी