30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमुंबईसंजय राऊत डिस्चार्ज नंतर पुन्हा म्हणाले, मुख्यमंत्री शिवसेनेचाच!

संजय राऊत डिस्चार्ज नंतर पुन्हा म्हणाले, मुख्यमंत्री शिवसेनेचाच!

लय भारी न्यूज नेटवर्क 

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या छातीमध्ये त्रास होत होता. सोमवारी रात्री राऊत यांच्यावर लिलावती रूग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली. अखेर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. माझी प्रकृती चांगली आहे. पुन्हा पक्षाच काम करु, उध्दव ठाकरेंसोबत काम करु. मुख्यमंत्री शिवसेनाच आणू असा पुनरुच्चार मध्यमांशी बोलताना केला.

राऊत यांच्यावर लिलावती रूग्णालयामध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस आढळून आले होते. आज तिसऱ्या दिवशी राऊत यांना डिस्चार्ज मिळाला, आणि ते घरी रवाना झाले.

राऊत निकालाच्या दुस-या दिवसापासून दररोज पत्रकार परिषदा घेऊन भाजपावर तोफ डागत होते. तसेच शरद पवारांशीही त्यांची भेट होत होती. त्यामुळे शिवसेना भाजपासोबत जाणार नाही हे जवळपास निश्चित झाले होते. अखेर त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेना, कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असे सरकार स्थापन होणार आहे. याची कल्पना असल्यामुळेच राऊत वारंवार मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असा दावा करत होते. आता पुन्हा राऊत आक्रमक झाले आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे लागल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरे म्हणाले, चर्चा योग्य दिशेने; अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासोबत खलबतं

… आणि शरद पवारांनी आमदारांचा हट्ट पुरवला

संजय राऊतांची भूमिका राज्यातील जनतेला आवडली, काँग्रेसने केले कौतुक

काल मंत्रीपदे गेली; आज कार्यालये, गाड्या, बंगल्यांवरही गंडांतर

शिवसेना, राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद, तर काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी