31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्र‘लंडन आय’ सारखं ‘मुंबई आय’, उंचीवरून घ्या मुंबईचं दर्शन!

‘लंडन आय’ सारखं ‘मुंबई आय’, उंचीवरून घ्या मुंबईचं दर्शन!

लयभारी न्यूज नेटवर्क

मुंबई : जगप्रसिद्ध लंडन ‘आय’च्या धर्तीवर पर्यटकांना मुंबई शहराचे सौंदर्य नजरेत सामावण्यासाठी ‘लंडन आय’ या इमारतीच्या धर्तीवर ‘मुंबई आय’ उभारण्यात येणार आहे. पर्यटकांना उंचावरुन मुंबई शहर न्याहाळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. याबाबत सरकार विचार करत आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी ( १५ जानेवारी ) पत्रकार परिषदेत दिली.

अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सी लिंकवरुन वरळीहून बांद्र्याला जात असताना समुद्राच्या किनारी एका जागेवर हे ‘मुंबई आय’ उभारण्याचा विचार सुरु आहे. या जागेला सीआरझेडची अडचण आली नाही तर इथे चांगल्या प्रकारे ही वास्तू तयार होऊ शकते. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्यांची पूर्तता करण्यात येईल. एमएमआरडीएकडून हा प्रकल्प उभारण्यात येईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

‘लंडन आय’ सारखं ‘मुंबई आय’, उंचीवरून घ्या मुंबईचं दर्शन!
जाहिरात

जगप्रसिद्ध ‘लंडन आय’च्या धर्तीवर मुंबईच्या पर्यटनात मोलाची भर टाकेल अशी ‘मुंबई आय’ इमारत उभारण्याचा सरकारचा विचार आहे. याबाबत बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आणि त्याला सर्वांनी सहमतीही दर्शवली.

काय आहे ‘लंडन आय’…

लंडन शहरात थेम्स नदीच्या दक्षिणेकडील काठावर ‘लंडन आय’ हा हा पाळणा उभारण्यात आला आहे. लंडनला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हे विशेष आकर्षणाचे ठिकाण आहे. या पाळण्यातून संपूर्ण लंडन शहराचे दर्शन पर्यटकांना घेता येते. युनायटेड किंग्डममधील हे सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी सुमारे ३५ लाख पर्यटक या स्थळाला भेट देतात. १३५ मीटर उंचीचा हा पाळणा ३१ डिसेंबर १९९९ रोजी पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता. याच्या बांधकामासाठी सुमारे ८ कोटी पाऊंड इतका खर्च आला होता. या ‘लंडन आय’मध्ये १२ अंडाकृती कुप्या आहेत. त्यात उभे राहून संपूर्ण लंडन शहर न्याहाळता येते. हे विशेष.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी