27 C
Mumbai
Monday, July 8, 2024
Homeराजकीयभाजपने धनगरांच्या देवस्थानांचीही केली फसवणूक, आता राष्ट्रवादीचे दत्ता भरणे पाळणार शब्द

भाजपने धनगरांच्या देवस्थानांचीही केली फसवणूक, आता राष्ट्रवादीचे दत्ता भरणे पाळणार शब्द

टीम लय भारी

सांगली :  ‘पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देणार’ असा शब्द भाजपने सहा वर्षांपूर्वी दिला होता. पण सत्तेवर आल्यानंतर संबंध पाच वर्षांत भाजपने हा शब्द पाळला नाही. भाजपने धनगर समाजाला फसविलेच, पण धनगरांच्या देवांनाही सोडले नसल्याचे समोर आले आहे. भाजपने दिलेली आश्वासने आता ‘महाविकास आघाडी’चे सरकार पूर्ण करणार आहे. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी तसे आश्वासन दिले आहे.

भाजपने धनगरांच्या देवस्थानांचीही केली फसवणूक, आता राष्ट्रवादीचे दत्ता भरणे पाळणार शब्द

सांगली जिल्ह्यातील बिरोबा (आरेवाडी) हे धनगर समाजाचे आराध्य दैवत आहे. या दैवताच्या विकासासाठी ६ कोटी रुपये देण्याचे आश्वासन भाजप सरकारने दिले होते. पण प्रत्यक्षात अवघे ६० लाख रूपये देवून बोळवण करण्यात आली. उरलेले ५.४० कोटी रूपये भाजपने आपल्या स्टाईलनुसार लटकवून टाकले. नुकतेच मंत्रीपदावर आलेले भरणेमामा बिरोबाचे आशिर्वाद घेण्यासाठी शुक्रवारी आरेवाडीला आले होते. त्यावेळी भाविकांनी भरणेमामांना भाजप सरकारचा हा पराक्रम सांगून टाकला. आश्वासन जरी भाजपने दिले असले तरी हे काम आमचे सरकार करेल. हा निधी खेचून आणण्यासाठी आपण अटोकाट प्रयत्न करू. बिरोबाच्या दर्शनासाठी राज्यातून तसेच परराज्यातून लाखो धनगर भाविक येत असतात. त्यामुळे या ठिकाणी लोकांची गैरसोय झाली नाही पाहीजे. तसेच बिरोबा परिसराचे सौंदर्यीकरण झाल्यामुळे हे तिर्थस्थान उत्तम पर्यटन केंद्र बनेल. अनेकांना रोजगार मिळेल. त्यामुळे बिरोबा मंदिर परिसराचा विकास व सौंदर्यीकरण यासाठी मी जाणीवपूर्वक लक्ष देणार असल्याचे मंत्री भरणे म्हणाले.

भाजपने धनगरांच्या देवस्थानांचीही केली फसवणूक, आता राष्ट्रवादीचे दत्ता भरणे पाळणार शब्द

धनगर आरक्षणाचा प्रश्न भाजपने गुंतागुंतीचा करून टाकला आहे. त्या पार्श्वभूमीवर सुद्धा भरणेमामांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आरक्षण मिळालेच पाहीजे यावर धनगर समाज आक्रमक आहे. समाजाला दिलासा देण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार असल्याचे भरणेमामा यांनी आश्वासन दिले.

भाजपने धनगरांच्या देवस्थानांचीही केली फसवणूक, आता राष्ट्रवादीचे दत्ता भरणे पाळणार शब्द

हे सुद्धा वाचा

VIDEO : मराठ्यांप्रमाणे धनगरांनाही आरक्षण हवेच : उद्धव ठाकरे

‘भाजपने राम शिंदेंचे लाड पुरविले, पण शिंदे धनगर, ओबीसींना भाजपकडे आकर्षिक करू शकले नाहीत’

VidhanSabha 2019 : भाजपच्या धनगर नेत्याला राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी

महाराष्ट्र भाजपमधील तमाशा पोहचला दिल्लीदरबारी!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी