28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमुंबईशरद पवार म्हणाले, चैत्यभूमी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा उत्तम संगम होईल;...

शरद पवार म्हणाले, चैत्यभूमी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा उत्तम संगम होईल; दोन वर्षांत स्मारक उभे राहील

टीम लय भारी

मुंबई : चैत्यभूमीवर करोडो आंबेडकरी जनतेची श्रद्धा आहे. आता चैत्यभूमीच्या नजीक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक उभे राहत आहे. त्यामुळे चैत्यभूमी व स्मारकाचा उत्तम संगम पाहायला मिळेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

शरद पवार यांनी आज इंदू मिल येथील प्रस्तावित डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाला भेट दिली. त्यांच्यासोबत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पवार यांना स्मारकाची प्रतिकृती दाखविण्यात आली. पवार पुढे म्हणाले की, स्मारक उभारणीच्या जवळपास सर्व मान्यता घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कंत्राटदाराने ठरविले तर स्मारक दोन वर्षात उभे राहिल. देशभरातील नागरिक स्मारकाला मोठ्या संख्येने भेट देतील. जगभरातील बौद्ध अनुयायी तसेच आंबेडकर प्रेमी जनताही या स्मारकाला मोठ्या संखेने भेट देतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी