29 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeमहाराष्ट्रMPSC ची परीक्षा २१ मार्चला होणार!

MPSC ची परीक्षा २१ मार्चला होणार!

टीम लय भारी

मुंबई :-  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने राज्य सेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. गुरुवारी राज्यभरात मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्याचे पहायला मिळाले. पुण्यासह नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक इत्यादी शहरांत परीक्षार्थी रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनांमध्ये विरोधकांनीही उडी घेतली. यानंतर राज्य सरकारला एक पाऊल मागे घ्यावे लागले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी तारीख जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार नवी तारीख जाहीर करण्यात आली असून २१ मार्चला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अधिकृत पत्र जाहीर करत ही माहिती देण्यात आली आहे. पत्रात देण्यात आलेल्या माहितीनुसार, १४ मार्च रोजी नियोजित करण्यात आलेल्या परीक्षेकरिता आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे उमेदवारांना वितरित करण्यात आलेल्या प्रवेश प्रमाणपत्रांच्या आधारे नमूद परीक्षा केंद्रांवर उमेदवारांना प्रवेश दिला जाईल. तसेच याशिवाय इतर परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. २७ मार्चला आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० तसेच ११ एप्रिलला आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० या दोन परीक्षा नियोजित तारखांना घेतल्या जाणार असून यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी