27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeराजकीयशरद पवारांची देखील ओळख आहे, अजित पवारांचा सुजय विखेंना टोला

शरद पवारांची देखील ओळख आहे, अजित पवारांचा सुजय विखेंना टोला

टीम लय भारी

मुंबई :- नगर जिल्ह्यातील रुग्णांसाठी दिल्लीहून रेमिडेसिविर इंजेक्शन (Remedicivir Injection) घेऊन आल्यामुळे वादात सापडलेले भाजप खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांना अजित पवारांनी जोरदार टोला हाणला आहे (Sujay Vikhe-Patil has been hit hard by Ajit Pawar).

भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी विशेष विमानाने रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला होता (BJP MP Dr. Sujay Vikhe had brought the stock of Remedesivir injection in Nagar district by a special plane). या साठ्याचे वाटप झाल्यानंतर त्यांनी व्हिडिओ चित्रफितीद्वारे ही माहिती दिली. राजकारण अथवा श्रेयासाठी नव्हे तर, गरीब जनतेचे प्राण वाचविण्यासाठी हे पाऊल उचलले.

‘कोरोना’मुळे गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार होऊ दिले नाहीत, पत्नीचा मृतदेह सायकलवर ठेवून पती वणवण भटकला

पण, सरकार कारवाई करेल म्हणून गोपनीयता बाळगली, असे त्यांनी व्हिडिओत म्हटले होते. त्यानंतर, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने विखेंचे कृत्य योग्य नसून ते साहित्य आरोग्य विभागाकडे जमा करायला हवे, अशा शब्दात खडसावले. त्यानंतर, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सुजय विखेंना जोरदार टोला हाणला आहे (Deputy Chief Minister Ajit Pawar has also slammed Sujay Vikhe).

खासदार सुजय विखे यांनी विशेष विमानाने इंजेक्शनचा साठा शिर्डीत उतरविला आणि तो वाटपही केला. त्यातील प्रत्येकी शंभर इंजेक्शन त्यांनी शिर्डीचे साईबाबा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयाला मोफत दिल्याचे त्यांनी म्हटले. सुजय विखेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे (This video of Sujay Vikhe has gone viral on social media).

भाजपचे नेते घरात रेमडेसिव्हीर, ऑक्सीजन तयार करतात का ? छगन भुजबळ यांचा सवाल

एकीकडे रेमडीसीवीर इंजेक्शनचा (Remedicivir Injection) तुटवडा जाणवत असताना, सुजय विखेंना हे इंजेक्शन मिळालेच कसे? (How did Sujay Vikhe get this injection?), असा सवाल अनेकांनी फेसबुकवर विचारला. तर, यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल झाली होती. त्यावर, सुनावणी करताना न्यायालयाने सुजय विखेंना फटकारले (The court struck down Sujay Vikhe). त्यानंतर, अजित पवार यांनीही शरद पवारांचा दाखला देत सुजय विखेंना सुनावले (Ajit Pawar also gave the testimony of Sharad Pawar to Sujay Vikhe).

सुजय विखे पाटील यांनी परदेशातून आणलेली औषधे किंवा इंजेक्शने सरकारकडे जमा करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. तुम्ही जरी लोकप्रतिनीधी असला तरी, तुम्ही जे साहित्य आणले ते कोणत्या कंपनींच आहे, त्याची तपासणी झाली का, त्याला मान्यता आहे का, या सगळ्या गोष्टी तपासून दिल्या जातात. आता, मधल्या काळात शरद पवार (Sharad Pawar) यांनाही ओळखीमुळे काहींनी दिल्या, त्यावेळी पुण्याचे असेल तर जिल्हाधिकाऱ्यांना द्या, साताऱ्याचे असेल तर जिल्हाधिकाऱ्यांना द्या, मुंबईला द्यायचे तर आयुक्तांना द्या, असे आदेश पवारसाहेबांनी दिले होते, असे उदाहरण अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले.

यांच्या विमानातील व्हिडिओचा आणि फोटोंचा कोणी अतिरेक करु नये, पण लोकप्रतिनिधींनी सगळ्या गोष्टींची शहानिशा करुनच आपले काम केले पाहिजे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले. उदाहरण सुजय विखेंचे (Sujay Vikhe) असले तरी सर्वच पक्षातील लोकप्रतिनीधींनी या महामारीच्या संकटात सामंजस्य भूमिका घ्यायला हवी, असेही पवार म्हणाले.

रुपाली चाकणकरांनी उपस्थित केले होते सवाल

”खासदार सुजय विखेंचा व्हिडीओ (Video of MP Sujay Vikhen) आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून १० हजार इंजेक्शन आणल्याचा केला गेलेला दावा हे संपूर्णपणे संशयास्पद आहे. एकीकडे नगर जिल्ह्यातील नागरिक इंजेक्शनसाठी मदतीची याचना करत असताना असे व्हिडीओ ही नागरिकांची चेष्टा आहे.

3.6 lakh new Covid infections and 3,292 deaths – India sets yet another grim record

एकतर सुजय विखेंनी (Sujay Vikhe) त्या बॉक्समध्ये काय होते हे स्पष्ट करावे आणि जर रेमडेसिविर (Remedicivir) असतील तर ते कुणाला वाटले अथवा सामान्य जनतेला ते कुठे मिळतील याची माहिती द्यावी.”, असे अनेक सवाल चाकणकर यांनी विचारले आहेत.

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी