31 C
Mumbai
Monday, September 23, 2024
Homeराजकीयराहुल गांधी यांचा बेरोजगारीवरून केंद्र सरकारला टोला

राहुल गांधी यांचा बेरोजगारीवरून केंद्र सरकारला टोला

टीम लय भारी

मुंबई :- कोरोना, जीएसटी, लॉकडाउन, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प, अर्थव्यवस्था यासारख्या अनेक विषयांवर राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. परंतु आज पुन्हा राहुल गांधी यांचा बेरोजगारीवरून केंद्र सरकारला टोला लगावला आहे (Rahul Gandhi unemployment has hit the central government hard).

आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बेरोजगारीवरून केंद्र सरकारवर (central government) टीकास्त्र सोडले आहे. केंद्र सरकारच्या ‘अब की बार मोदी सरकार’ या घोष वाक्याची त्यांनी खिल्ली उडवली आहे. मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

काकांच्या स्मृतिदिनी धनंजय मुंडेंची भावूक पोस्ट

गायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादीत प्रवेश

A Study In Contrasts: Looking At PM Modi’s Social Media Policy After Rahul’s Purge Move

“अबकी बार करोडो बेरोजगार, कोण जबाबदार? फक्त आणि फक्त मोदी सरकार” असे ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केले आहे. त्याचबरोबर ‘अबकी बार करोडो बेरोजगार’ यासाठी हॅशटॅग वापरला. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्वीट केल्यानंतर कमेंट्स बॉक्समध्ये काँग्रेस आणि भाजपा पक्षातील कार्यकर्ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

यापूर्वीही ‘एक तो महामारी, उस पर प्रधान अहंकारी’ असे ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केले होते. या ट्वीटसोबत त्यांनी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव यांच्या आरोपांचा दाखला दिला होता. त्यांनी कोरोनाच्या उपलब्ध मात्रा आणि जागतिक आरोग्य संघटनेची नियमावली यांचा कुठे ही तालमेल लक्षात ठेवला नसल्याचा संदर्भ दिला होता.

गेल्या काही दिवसात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यांच्याच पक्षाचे काही नेते, काही मित्र आणि काही पत्रकारांना अनफॉलो केले आहे. यामध्ये वायनाडच्या कार्यालयातले काही लोक आणि दिल्लीतल्या काही ज्येष्ठ पत्रकारांचाही समावेश आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या या कृतीची सोशल मीडियावर तसेच राजकीय वर्तुळांमध्येही जोरदार चर्चा आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी