30 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeसंपादकीयराहुल गांधी... २०२४ सालातील देशाचे पंतप्रधान

राहुल गांधी… २०२४ सालातील देशाचे पंतप्रधान

ऍड. विश्वास काश्यप

राहुलजी, आपल्या ५१ व्या वाढदिवसानिम्मित आपल्याला खूप खूप शुभेच्छा…

नावात काय आहे?

शेक्सपिअरने लिहिलंय नावात काय आहे. परंतु राहुलजी आपल्या नावातच सर्व काही आहे. तथागत गौतम बुद्धांच्या मुलाचे नाव राहुल होते. तुमचे पणजोबा पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांना बुद्ध तत्वज्ञानाचं फार मोठं आकर्षण होते. त्यामुळेच असेल कदाचित तुमच्या आजीने तुमचे नाव राहुल ठेवले.

राहुल गांधी म्हणजे…

राहुल गांधी म्हटले की एक हुशार, संयमी, विवेकी, अभ्यासू, नम्र, देखणं आणि प्रसन्न व्यक्तिमत्व लाभलेला, उच्चशिक्षित, संवेदनशील, देशाचा नेतृत्व खंबीरपणे करू शकणारा सहृदयी माणूस डोळ्यासमोर उभा राहतो.

वडिलांप्रमाणेच नवनवीन वैज्ञानिक संशोधनात रुची असणारा राहुल.

विलासराव देशमुख, बाळासाहेब थोरात आणि कोकरू!

कॉंग्रेसच्या माण तालुकाध्यक्षपदी दादासाहेब काळे यांची नियुक्ती

At 51, Rahul Gandhi stays ever young in Indian politics

भाजपा आय. टी. सेल…

राहुलजी, भाजपा सरकार तुम्हाला पहिल्यापासून घाबरत आहे. सन २०१४ च्या अगोदरपासून त्यांनी तुम्हालाच टार्गेट करायला सुरुवात केली. तुमच्या छोट्या छोट्या चूका शोधून त्यात स्वतःचा नवीन मिरची मसाला टाकून भाजपा आय. टी. सेलने तुम्हाला जाणीवपूर्वक बालिश आणि हास्यास्पद बनविले. तुम्हाला “पप्पू” केले. समाजमाध्यमाचा त्यावेळेस सर्वात नीच आणि घाणेरडा वापर त्यांनी केला. दिड दमडीचे हे आय. टी. सेलवाले वाटेल तसे आपल्याविरुद्ध प्रचार करीत होते. हा प्रचार इतका निर्दयी होता की सगळा देश गोंधळून गेला. स्वतःला विचारवंत समजणारे भले भले दिड शहाणे तुमच्यावर टीका करायला लागले. त्यांच्यासाठी तुम्ही एक सॉफ्ट टार्गेट होतात. आधीच मरगळलेल्या अवस्थेत असणारी तुमची काँग्रेस त्या भयंकर हल्ल्यासमोर अगदी हतबल झालेली दिसली. आपण सुद्धा वैयक्तिक बरेच बॅक फुटवर गेलात. आपल्याला इतक्या खालच्या पातळीवरचा प्रचार अपेक्षित नव्हता. कारण तोपर्यंत भारतीय राजकारणाची पातळी इतक्या खालच्या पातळीवर कधीच गेली नव्हती. सगळा भारत देश ह्या भाजपा आय. टी. सेलवाल्यांनी (राज ठाकरेंच्या भाषेत नाजायज औलाद) गोंधळून ठेवला होता. तो अजूनही बऱ्यापैकी गोंधळलेलाच आहे. जितका देश गोंधळलेला असेल तितके ह्या गोंधळी लोकांना हवेच आहे.

मानवतावादी विचार…

आपण लहान वयात आपल्या आजीची आणि ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर वडिलांची हत्या पहिली. एखादा असता तर तो क्रूर मानसिकतेचा झाला असता. सगळया समाजाला दोष देऊन आपण एक चिडखोर, हुकूमशाही वृत्तीचे झाला असता. परंतु तसे न होता आपण एक संयमी, मानवतावादी विचारांचे पाईक झालात.

एकाग्रचित राहुल…

ह्या भाजपावाल्यांनी आपल्याला जेवढया घाणेरड्या पद्धतीने ट्रोल केले तेवढ्या पद्धतीने संपूर्ण जगातून ट्रम्प ना सुद्धा ट्रोल केले गेले नाही. ज्यांना धड एक वाक्य सरळ लिहिता, बोलता येत नाही, ज्यांचा आय. क्यू. दहा ते अकरा वर्षाच्या मुलांच्या इतका आहे ते अंधभक्त तुमच्यावर घरात बसल्या बसल्या टीव्ही वरील बातम्या पाहत तोंडसुख घेत होते. परंतु आपण  आपल्या मनावरचा संयम कधीच ढळू दिला नाही. ह्या गोष्टीला फार मोठी शक्ती लागते. मनाचा मोठेपणा लागतो. व्हाट्सउपच्या ग्रुपवर जर कोणी एकदोघांनी मिळून आमच्यावर टीका केली तर आम्ही दोन दोन दिवस अस्वस्थ असतो. आम्हाला झोप येत नाही. आपण इतके कसे एकाग्रचित राहू शकता?

उच्च प्रतीची एकाग्रता…

आमच्या आईला जर कोणी बोलले तर आम्ही झटकन आरे ला कारे करतो. इथे भारतीय संस्कृतीचा उदो उदो करणारे, उच्च कोटींची परंपरा, देवींची पूजा, नवरात्री उत्सवात फक्त गरम पाणी पिऊन दिवस काढणारे, आपल्या आईला घाणघाण भाषेत बोलून त्यांना बारबाला म्हणून हिणवतात तेव्हा तुम्ही किती शांत असता. इतक्या उच्च प्रतीची सहनशीलता कोठून शिकलात आपण?

बेईमान व्यापारी, उद्योजक…

ज्या व्यापाऱ्यांनी, उद्योजकांनी काँग्रेसच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार करून प्रचंड माया जमविली तीच मंडळी काँग्रेसला नावे ठेऊ लागली. आपल्याला बालिश समजू लागली. कारण ह्या जमातीला आता त्यांच्याच जमातीतील एक म्होरक्या मिळाला होता. त्या म्होरक्याला त्याच्यात असलेले नसलेले सर्व गुण चिकटवून त्यांनी त्याला जादूच्या दिव्यातील जिनी करून टाकला. बस तो म्होरक्या आल्याआल्याच देशाला स्वर्ग बनवून टाकेल. पण पहिल्या काही वर्षातच ह्या मंडळींना त्यांची चूक लक्षात आली. परंतु गिरे तो भी टांग उपर ह्या न्यायाने कसेबसे ही मंडळी आपल्या म्होरक्याचा उदोउदो करण्यात गुंगच राहिली. गेल्या एक वर्षापासून आणि आता कोरोनो महोत्सवात तर ह्यांच कंबरडच मोडलय. ह्या व्यापारी उद्योजकांच जेवढं नुकसान होईल तेवढं चांगलंच आहे. कारण केवळ ह्यांच्यामुळेच ही ब्याद आमच्या डोक्यावर बसवली गेली आहे. आता उद्योजक बुडाले तर देशाचं काय होणार असले फालतू प्रश्न विचारून काहीही होणार नाही, हे भिकेला लागलेच पाहिजेत कारण सर्वसामान्य जनता ह्यांच्या काळात भिकेलाच लागली आहे.

विपश्यनेचा प्रचंड प्रभाव…

आपण मध्यंतरी विपश्यना केलीत. त्यानंतर आपल्या व्यक्तीमत्वात कमालीचा आत्मविश्वास आणि एक डॅशिंग नेता आम्हाला दिसून आला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही खऱ्या अर्थाने अखिल भारतीय पातळीवरील तुमचं नेतृत्व सिद्ध केलत. आपली भाषणे, बिनतोड युक्तिवाद, ते चौकीदार वगैरे वगैरे. काही विचारू नका. आपण एक झंझावात निर्माण केलात. वाटले संपले ह्या गँगचे दिवस. परंतु आम्हा सर्वांच्या दुर्दैवाने (अंधभक्त सोडून) इव्हीएमच्या मदतीने हे पुन्हा मोठ्या संख्येने निवडून आले.

राजीनामा…

त्यानंतर अतिशय विचारपूर्वक आणि नम्रपणे आपण काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलात.

जशास तसे…

आता भाजपा आय टी सेलवाल्यांच्या तोडीस तोड आपल्या पक्ष्याचे आय टी सेल काम करू लागले. त्याला घाबरून पूर्वी एक व्हाट्सउपच्या एक क्लीकवर शेकडो लोकांना जाणारी पोस्ट आता फक्त पाचच जणांना जाऊ लागली. खरतर तुमच्या आक्रमकतेला घाबरून सरकारने खेळलेली ती चाल होती. घाबरून गेले होते ते.

संसदेतील मिठी…

संसदेत तुम्ही मारलेली मिठी आम्हा सगळ्या देशवासीयांना भावली. ज्याला मिठी मारलीत ती व्यक्तिसुद्धा काहीकाळ गडबडली. काही सुचेनासे झाले त्यांना. परंतु सत्तेची नशा चढलेल्या त्या व्यक्तीने त्यानंतर साधे उभे राहण्याचे सुद्धा सौजन्य दाखविले नाही. इतका मग्रूरपणा संसद पहिल्यांदाच पाहत होती.

पिसाळलेला मीडिया…

व्यापारी, उद्योजकांच्या हातात संपूर्ण मीडिया असल्याने ते तुमच्यावर अक्षरशः तुटून पडतात. अर्णब गोस्वामी सारखा पाळलेला पत्रकार तुमच्या संबंधात असलेल्या बातमीत मोठ्याने किंचाळतो. आपली छटाकभर असलेली पत्रकारिता तो आपल्यावर टीका करून टिकवून ठेवतोय. आपल्यावर टीका करून अशा कित्येक पत्रकारांचे कुटुंब पोटभर खात आहेत. ह्या दलालांनी आपल्यावर जवळ जवळ बहिष्कारच घातला आहे. फक्त आपल्या विरोधातली बातमी देण्यातच हे धन्यता मानतात. नाइलाजास्तव कधी कधी ते तुम्हाला दाखवितात. तुमच्या बद्दल जास्त काही दाखवायला सुरुवात केली की लगेच त्यांचा अदृश्य मालक डोळे वटारतो. लगेचच हे शेपटी आत करून गोल गोल घुटमळायला लागतात.

देशाला कोरोनाचा धोका सांगणारा प्रथम व्यक्ती…

देशाला कोरोनाचा सगळ्यात मोठा धोका आहे याची पहिली जाणीव आपल्याला झाली. देशहितासाठी आपण ती सरकारला सांगितली. परंतु सरकारने त्याकडे तुच्छतेने दुर्लक्ष केलं. त्याचे परिणाम आज संपूर्ण देश भोगतोय. (त्यात हे अंधभक्त सुद्धा आले)

ऑनलाइन पत्रकार परिषद…

कोरोना महोत्सवाच्या दरम्यान आपण फेसबुकवर येऊन ऑनलाइन पत्रकार परिषद घेतलीत. त्यात एक पत्रकाराने आपल्याला एक प्रश्न केला की कोरोना बाबत केंद्र सरकारचे काय काय चुका झाल्या आहेत असे आपणास वाटते? ह्यावर आपण उत्तर दिलेत की, पहिल्यांदा आपण सर्वांनी कोरोनावर विजय प्राप्त करू. त्यानंतर सरकारने काय काय चुका केल्या त्या मी आपल्याला सांगेन. आता सरकारच्या चुका सांगण्याची ही वेळ नाही. किती ही प्रगल्भता! एखादा उपटसुंभ म्हणाला असता की, सरकारच हे चुकलं ते चुकलं. सध्या असल्यांची चलती आहे. टाळ्या वाजवा, दिवे विजवा, आकाशातुन फुले टाका असे वेगवेगळे भयानक आणि हास्यास्पद प्रयोग होत असताना सुद्धा आपण कधीही सरकारवर टीका केली नाही.

देशाच्या अर्थव्यवस्थेची काळजी असलेला नेता…

देशाची अर्थव्यवस्था बिघडत चालली आहे. केंद्रातील सत्ताधारी पक्षाला त्याची काहीही फिकीर नाही. खरेतर संपूर्ण जबाबदारी त्यांची. तसे पाहिले गेले तर सत्ताधारी पक्षाला जेवढे अपयश येईल तेवढे तुमच्यासाठी चांगलेच होते परंतु आपण तसा क्षुद्र विचार केला नाहीत. आपण जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ रघुराम राजन, अभिजित बॅनर्जी, उद्योजक राजीव बजाज ह्यांच्याशी मोकळेपणाने जाहीररीत्या बोलून सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेने काय काय उपाय केले पाहिजेत यावर सार्वजनिक चर्चा केलीत. ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवर तुम्ही सरकारला अप्रत्यक्षरीत्या उपाय सुचवित होतात. अशा ह्या कृत्यासाठी ह्यांची आभार मानायची सुद्धा दानत नाही.

कारुण्याने भरलेलं व्यक्तिमत्व…

लॉकडाऊनमध्ये रस्त्याने चालणाऱ्या मजुरांना तुम्ही कोरोनाची भीती मनात न बाळगता रस्त्यावर जाऊन भेटलात. किती ही माणुसकी, करुणा! अशा ह्या करणेसाठी किती इंचाची छाती आहे हे पाहिले जात नाही. टीव्ही वर भाषण द्यायला येताना सुद्धा मास्क लावून येणाऱ्या नेत्यांना ते कळणार नाही.

खरा देशभक्त…

कालच चिन्यांच्या आक्रमणानंतर तुम्ही प्रधानमंत्र्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात हे जाहीरपणे सांगितले. किती हा मनाचा उदारपणा औदार्यपणा! ज्या सरकारने तुमची वाटेल तशी बदनामी केली त्याच सरकारच्या पाठी तुम्ही पक्ष म्हणून ठामपणे उभे राहिलात. देशभक्ती देशभक्ती की काय ती ह्यालाच म्हणतात ना? चीनशी इकडे हजारो कोटींचे कॉन्ट्रॅक्ट करायचे आणि चिन्यांनी तयार केलेल्या चड्डी बनियन वर बहिष्कार घाला म्हणणाऱ्यांना ही देशभक्ती कशी पचणार, कशी दिसणार?

आता आपली इनिंग आणि कर्माचा सिद्धांत…

असो. राहुलजी, आपण २०२४ मध्ये भारताचे पंतप्रधान होणार ह्यात तिळमात्र ही शंका नाही. ह्यांची ही शेवटची इनिंग आहे. कारण त्यांचा हा दुसरा डाव आहे. क्रिकेटमध्ये तिसरा डाव नसतो. आता आपली इनिंग सुरू होईल. कोणत्याही परिस्थितीत हे परत येणार नाहीत कारण “कर्माचा सिद्धांत” ह्यांनाही लागू होतोच की नाही?

आपल्याला पुन्हा एकदा आजच्या वाढदिवसाच्या आणि २०२४ च्या प्रधानमंत्री पदाच्या आताच मनःपूर्वक शुभेच्छा…

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी