30 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeएज्युकेशनडॉ. त्रंबक राजदेव यांना शैक्षणिक कार्य गौरव पुरस्कार जाहीर

डॉ. त्रंबक राजदेव यांना शैक्षणिक कार्य गौरव पुरस्कार जाहीर

टीम लय भारी
संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्राध्यापक डॉ. त्र्यंबक भिमराज राजदेव यांना ज्ञानोदय संस्थेच्या वतीने शैक्षणिक कार्यातील उत्तुंग  योगदानाबद्दल शैक्षणिक कार्य गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. (Educational Work Pride Award to Trambak Rajdev)

डॉक्टर त्रिंबक राजदेव हे 1992 पासून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. याच काळात त्यांनी कॉम्रेड दत्ता देशमुख यांच्यावर प्रबंध  सादर करून पीएचडी मिळवली आहे. अत्यंत शांत संयमी व विद्यार्थी प्रिय असलेल्या डॉ. राजदेव यांनी कायम शिक्षण क्षेत्रामध्ये अनमोल योगदान दिले आहे.

मुंबईत ‘बर्निंग बाइक’; पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 25 दुचाकी जळून खाक

फडणवीसजी, स्वप्नातून बाहेर या आणि वास्तव स्विकारा; अतुल लोंढेंचा टोला

विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहित करणाऱ्या  राजदेव यांच्या कार्याची दखल घेत टाकळीभान श्रीरामपूर येथील ज्ञानोदय शिक्षण संस्थेच्या वतीने सन 2020- 21 या शैक्षणिक वर्षातील उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरीबद्दल त्यांना शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार जाहीर झाला असून लवकरच तो शानदार कार्यक्रमात देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष तुषार दाभाडे, उपाध्यक्ष देविदास बनकर व कार्याध्यक्ष अर्जुन राऊत यांनी दिली आहे.

डॉ. राजदेव यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे ,संस्थेचे सेक्रेटरी लक्ष्मणराव कुटे, रजिस्टार बाबुराव गवांदे ,दत्तात्रय चासकर, प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील ,उपप्राचार्य प्रा. शिवाजी नवले, प्रा. बाळासाहेब वाघ, प्रा. सुहास आव्हाड, इतिहास विभाग प्रमुख प्रा. नामदेवराव ढोणे, माजी प्राचार्य ज्ञानेश्वर गोंटे यांचेसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

आनंदवार्ता: दिवाळीपूर्वी केंद्र सरकार 6 कोटी नोकरदारांच्या खात्यात पीएफच्या व्याजाचे पैसे करणार जमा

Wine Enthusiast’s 22nd Annual Wine Star Award Nominees

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी