27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमुंबईशिवसेनेचा पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस - राष्ट्रवादीचे 'तळ्यात मळ्यात'

शिवसेनेचा पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस – राष्ट्रवादीचे ‘तळ्यात मळ्यात’

लय भारी न्यूज नेटवर्क 

मुंबई : शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते काल मुंबईत आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत तब्बल दोन तास त्यांनी चर्चा केली. पण चर्चेनंतरही शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत अंतिम फैसला झाला नाही. एका बाजूला शिवसेना सत्ता स्थापन करण्याच्या हातघाईवर आलेली असताना काँग्रेस – राष्ट्रवादीने मात्र ‘आस्ते कदम’ची भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार अहमद पटेल म्हणाले की, शिवसेनेने सोमवारी पाठिंब्याबाबत प्रथम संपर्क केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि मला फोन केला होता. सोमवारी उद्धव ठाकरेंनी संपर्क केल्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कळवलं. त्यानंतर आम्ही आज मुंबईत आलो व शरद पवारांशी चर्चा केली. पुढे आमच्या दोन्ही पक्षांमध्ये चर्चा होईल. काही मुद्दे आमच्यातच स्पष्ट व्हायचे आहेत ते झाले की आम्ही शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत निर्णय घेऊ.

राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घाई केली. काँग्रेसला चर्चेसाठी बोलवलं नाही. तसेच यापूर्वी केंद्राच्या सत्ताधीशांनी गोवा, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक व इतर काही राज्यामंध्ये सत्तेचा गैरवापर केला. महाराष्ट्रात जी राष्ट्रपती राजवट लागू केली त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो असे ते पत्रकार परिषदेत म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते के. सी. वेनूगोपाल, मल्लिकार्जून खर्गे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेला काँग्रेस – राष्ट्रवादी उल्लू बनवित आहे : नारायण राणे

महाराष्ट्रात तिस-यांदा राष्ट्रपती राजवट; काय आहे राष्ट्रपती राजवट ?

राज्यपालांची भूमिका त्यांच्या टोपीच्या रंगाला साजेशी; काँग्रेसचा हल्लाबोल

राष्ट्रवादीला पाठिंब्यासाठी काँग्रेसच्या जाचक अटी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी