29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षणावरील सुनावणी आता जानेवारीत

मराठा आरक्षणावरील सुनावणी आता जानेवारीत

लय भारी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावर होणारी सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर पडली आहे. हायकोर्टाने दिलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरुद्ध ही याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर मंगळवारी सुनावणी होणे अपेक्षित होते. परंतु, न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी जानेवारी महिन्यात घेणार असे स्पष्ट केले आहे.

तत्कालीन शिवसेना भाजपच्या राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या लक्षात घेता 16 टक्के आरक्षणाचा कायदा आणला. परंतु, हायकोर्टाने तो वैध ठरवतानाच त्याची टक्केवारी कमी करून 12-13 टक्के केली. 27 जूनला आलेल्या हायकोर्टाच्या निकालाविरुद्ध जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

नवनियुक्त सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आलेल्या सर्वच याचिका एकत्रित करण्याचे निर्देश दिले. तसेच त्यावर आता 22 जानेवारी रोजी सुनावणी होणार असे जाहीर केले. मराठा आरक्षणावर हायकोर्टाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले तरी घाबरण्याचे काहीच कारण नाही. याचा मराठा आरक्षणावर काहीच परिणाम होणार नाही असा दावा आरक्षण आंदोलनातील नेत्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी